Wednesday, December 1, 2021

असे असते तर.. ( भाग १ )

 अस्वीकरण :- ही गोष्ठ काल्पनिक असुन यात कोणत्याही व्यक्तीचे व समाजाचे मन‍ दुखावले असेल तर त्यास माफी असावी.


जीवनातील खरे देव म्हणजे आई बाबा,

गोष्ठ होती एका पारंपरिक घरातील,

घरात पति पत्नी राहत असे,

त्यांना एक मुलगा होता

त्यांचा मुलगा आता समाजदार व जबाबदार झाला असतो

तो आपली वकील ची डिग्री घेऊन जेमतेम स्थायी झाला असतो,

आई बाबा आपल्या मुलाचे लग्न करुन देतात

सर्व काही आनंदमय चालले होते,

पण ते म्हणतात न की, आनंद जास्त वेळ टीकू नाही शकत.

वारंवार सासु-सुनेचे घरी वाद होऊ लागले,

त्यांचा त्रास वाढू लागला तसेच

मुलगा सुध्धा त्यांना त्रासुन जातो, 

व दूर बाहेर निघुन जातो.



याच स्थितीला पाहुन त्याची पत्नी ही वेळ निघुन जावा म्हणून टाईमपास साठी फेसबुक वर फेक अकाउंट चालवत असे,

त्यावर आपला वेळ घालवत असे,

घरी चालत असलेला वाद पाहुन व वारंवार तोच विचार करुन ती

फेसबुक वर एके दिवशी एक पोस्ट प्रकाशित करते ज्या मध्ये असे लिखित होते की,


'जर आई बाबांना सांभाळायची जबाबदारी जर लग्न झाल्यावर मुली कडे दिली तर कोनतेही आई-बाप बेघर होणार नाही तसेच वादविवाद होनार नाही '




योगयोग ही पोस्ट तिचा पति पाहतो, व हसून त्यावर एक छान अशे उत्तर लिहितो की,


'तेच जेव्हा मुलगी लग्न करुन सासरी येते तेव्हाच जर तिने आपल्या सासु-सासरे यांना स्वतःचे आई-बाबा म्हणुन जर त्यांना सांभाळायची जबाबदारी घेतली तर या जगात वृद्धाश्रम सारखे स्थळचं निर्माण झाले नसते' 


आणि योगायोग तो आपल्या घरी परतला असतो,


हे उत्तर पाहुन तिला आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप होतो लगेच ती आपल्या पतिला जाऊन एक मिठी मारते आणि हळूच सॉरी म्हणुन रडू लागते.



मुळात सांगायचे झाले तर आई-बाबा कोणाचेही असो त्यांना आपुलकिनी जपलं तर वृद्धाश्रम सारख्या जागी जायचे कामचं पडणार नाही. 


                              --------- प्रथमेश राजु गणेशकर



1 comment:

Please do not enter spam link in the comment box

My Blog List