Saturday, January 15, 2022

सोपी नसते हो सैनिकांचे जीवन | Indian Armed Forces | Indian Armed Forces

भारतीय लष्कर दिन दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.                                             
यावर्षी भारत ७४ वा लष्कर दिन साजरा करत आहे.

हा प्रवास आहे भारतीय सैनिकांचा...
ही गोष्ठ आहे एका ग्रामीण गावातील..
त्या गावातील मुले नेहमी स्वप्न पाहत असे की त्यांना कधी भारताची सेवा करायची संधी मिळेल.. 

पण

संघर्ष प्रत्येक तर पायरीवर असतोच...

भारतीय सैन्याचा पेपर पासून त्यांची सुरुवात होते..
पेपर ला खुप अभ्यास केला असतो पण भिति राहते पेपर फुटण्याची..
कारण पेपर फुटला की तो अभ्यास व तो अमूल्य वेळ वाया जातो...
पेपर नंतर ट्रेनिंग व फिजिकल फिटनेस वगैरे वगैरे...
येवढ़ सगळ करून मग चिमुटभर मुलांची निवड होते...

आणि मग मुल लागतात देशाची सेवा करायला.

संपूर्ण आयुष्य आपल्या धरती मातेला अर्पण करुन देतात.

पण मात्र संघर्ष इथेच संपत नाही,

कारण सिमेवर प्रत्येक मिनिट डोळ्यात तेल घालून ऊभ राहव लागतं.

कारण कुठल्या दिशेने एक गोळी येणार आणि ऊंच आकाशात घेऊन जाणार. 
आई, बहिन, दादा अन बाबा यांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा देऊन जाणार.

भारतीय सैनिकांचे जीवन सोपी नसते हो. 

"उष्ण ऊन असो की असो गार वारा, उष्ण ऊन असो की असो गार वारा...
की असो थंड्या पाण्याच्या धारा, नेहमी सिमेवर उभा राहत असतो सैनिकांचा पाहरा.."

सोपी नसते हो भारतीय सैनिकांचे जीवन...

आपण आपली सर्व कामें करुन घेऊ शकतो गार झोप,
त्यांना काम केल्यावर पण नशीबी नसते थोड़ी तरी झोप...

सोपी नसते हो भारतीय सैनिकांचे जीवन...

रक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या कर्तृत्वास सलाम!

                                                                                                      - प्रथमेश राजु गणेशकर



No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List