Wednesday, December 29, 2021

३१ डिसेंबर आणि मी...

३१ डिसेंबर
जल्लोश इंग्रजी वार्षिक कैलेंडर संपवुन,
नव वर्ष्यात प्रवेश करण्याचा....
आज आपण एक नाण्याच्या दोन बाजू पाहुया..


• प्रथम बाजू

अरे....  
चल रे पार्टी करू,
बेधूंद दारूच्या नशेत रस्त्यावर लोटांगन घेण्यापर्यंत जोरात पार्टी करूया...
रात्रभर पार्टी करू आणि मज्जा करू...
माझा पगार झालाय सांग तू कुठे जायचं..
आज ३१ ला पूर्ण पगार अर्पण करू..

मग काय
पिली दारू, केली पार्टी..
चल बरं घरी जाऊया खुप वेळ झालाय...
गाडी ची किक मारून निघालेत साहेब. 
पूर्ण रस्ता जसा आपल्या सासर्याचाच..
गाडी काय निर्जीव वस्तु त्याला जस नियंत्रित करणार
तसे ते होई...
आणि

गाडी डिवाइडर वर गेली आणि ३१ डिसेंबर सोबत आयुष्याचा देखिल ३१ डिसेंबरचं झाला...

अर्धा तासात पूर्ण खेळ खतम...

• दूसरी बाजू

३१ डिसेंबर नव्हे तर आपले नववर्ष 'गुढीपाडवा'
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
सकाळी पहाटे उठून छान स्वच्छ अंघोळ करुन..
आई ला गुढी उभारण्यात आणि बाबाला घरी भगवा ध्वज लावण्यात मदत करूया..
त्याचप्रमाने मंदिरात जाऊन नववर्ष्याची सुरुवात करूया..
आणि आपले जीवन सुखरूप व आनंदीमय जगुया...

तर अशा दोन बाजू आता तुम्हीच ठरवा की कोणती बाजू आपल्यासाठी योग्य राहिल...

आणि हो ३१ दिसेंबर जर साजराचं करायचा असेल तर 
पहिल्या बाजू सारखे न करता..
काही वचन स्वतःला दया,

मी वचन घेतो की,

• चुकीच्या मार्गी लागणार नाही
• कोणतेही व्यसन करणार नाही
• पहिले प्राथमिकता आपले करियर घडविण्यासाठी
• आणि या इंग्रजी नव वर्ष्यात नवनविन गोष्टी शिकण्यात मी माझा वेळ खर्च करेल
• आणि पगार पार्टी मध्ये न उडवता पैसे जमा करेल...

धन्यवाद....

                            -प्रथमेश राजु गणेशकर





1 comment:

Please do not enter spam link in the comment box

My Blog List