Thursday, January 13, 2022

मकर संक्रांति का साजरी करतात ? Makar Sankranti 2022: Date, Puja Time, History, Significance | Makar Sankranti: Reaping the Benefits of the Season

(दिवस १४ जानेवारी २०२२)

भारतीय सांस्कृतीत सणांची मानवी जीवनात अधिक जास्त महत्व मानले जाते. कारण प्रत्येक सणांमागे काही ना काही उद्देश असतो.
मग दिवाळी असो की गुढीपाडवा हिंदू धर्माची एक वेगळीच शान आहे. इंग्रची वार्षिक कैलेंडर तसेच जानेवारी महिण्यातला पहिला हिंदू धार्मिक सण म्हणजेच 'मकर संक्रांति'.

या दिवशी तिळगुळ देऊन 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. मानवी जीवनातील कडवटपणा नष्ट होवो उद्देशाने एकमेंकांना तिळगुळ दिले जाते. 

मकर संक्रांति हा सण हिवाळ्यात  जानेवारी महिन्यात १० ते २० तारखेच्या जवळपास येत असतो. ठंडी मुळे त्वचा कोरडी होते आणि मानवी अंगातिल उष्णता कमी होते. तसेच तिळगुळ हे उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्‍याचे काम करत असते.


या दिवशी स्त्रिया दिवशी हळदी‍ कुंकू देण्या घेण्याच्या तसेच मतभेद दूर करण्याचा उद्देशाने गोळा होतात. आणि 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून दिवस साजरा करतात. तसेच पुरुष आणि तरुण मुल आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून तरी हा सण साजरा करण्याची प्रथा भारतात आहे. या दिवशी संपूर्ण आकाश रंगबेरंगी पतंगानी भरभरून जाते. आणि या दिवसाचा आनंदानी शेवट होतो.


अशा अनेक पद्धतिंनी भारतात मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List