Sunday, January 30, 2022

व्यसन करा | CARRIER | Health Effects of Cigarette Smoking | Smoking: Effects, Risks, Addiction, Quitting, Treatment

'व्य स न' या तीन शब्दामागे बरेचशे आयुष्य आधारित आहे. 

           ड्रग्स,गांजा, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा व इतर सर्व जिवघातक व्यसनांच्या आधिन आजची युवा पिढी जाते. आणि आयुष्याचं वाटोळं करुन येते. मग पुरुष असो स्त्रिया असो की युवावर्ग असो अशा सर्व पिढी या व्यसनाकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे. 

       काही काळ का असो ना पण त्यांना त्यामधून आनंद होत असतो. म्हणून सर्वजन व्यसन करतात.

          पण तोच काळ त्यांचा वाईट काळ म्हणून निर्माण होतो. व्यसनांची सुरुवात करायला काही वेळ लागत नाही पण त्यापासुन दूर राहायला किंवा त्याला दूर करायला संपूर्ण आयुष्य निघुन जाते. तर आज अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या गोष्टींचे व्यसन आपण नक्की केले पाहिजे.

    व्यसन करा हो पण या तीन गोष्टीचं...

  पहिले व्यसन म्हणजेच 'पैसा
                                        पैसा जेवढा कमवा तेवढा कमीच असतो. पण जेव्हा पैशाची अडचण येतेे तेव्हा ते सोडविण्यासाठी शेवटी पैसाच कामात पडतो. पैशाचे काम शेवटी पैसाच करतो. म्हणून वयवर्ष १८ ते ४० वर्ष होयपर्येंत माणसाने पैशाच्या मागे राहले पाहिजे. आश्चर्यचकित होण्यासारखे म्हणजे कोरोना काळात ज्यांनी शिक्षण घेतले होते त्यांच्या पेक्षा जे अशिक्षित होते त्यांनी या काळात अधिक जास्त प्रमाणात पैसा कमावला. मग तो भाजीवाला असो की दुधवाला अशा अनेक उद्योजकांनी पैसा कमावला. म्हणून पैसा कमाविण्यासाठी शिक्षणच घेणे आवश्यक नाही तर स्वबळ आवश्यक आहे.
                                        

दूसरे व्यसन म्हणजेच 'शिक्षण
                                      योग्य शिक्षण कधीच वाया जात नाही. मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. शिक्षणामुळे मानवी जीवनातील एक शैक्षणिक गुण जागरूक होतो. योग्य शिक्षण हे आपल्या जीवनामध्ये खुप प्रभावशाली असते. नौकरीसाठी प्रथम प्राथमिकता शिक्षणालाच देतात.


तिसरे आणि शेवटचे म्हणजेच 'सुदृढ आरोग्य

                                                   शरीर सुदृढ तसेच आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करने आवश्यक असते. कारण पैसा कधिच आयुष्य विकत घेऊ शकत नाही. एकदा जीव गेले की गेलेच. दिवसातुन ४ पैकी १ जनांचा मृत्यु ह्रुदयविकारामुळेच होतो. तसेच ३० प्रमाणात लोकसंख्या हृदयवीकारामुळे आपले आयुष्य गमावतात. आता तर याचे प्रमाण युवा पिढींमध्ये सुद्धा अधिक जास्त प्रमाणात वाढले आहे. दररोज नियमित व्यायाम केला की मानवी शरीरात सकारात्मक विचार जागरूक होतात. त्यामुळे मन प्रफुल्लित होते व आयुष्यामध्ये सकारात्मक विचार व ऊर्जा निर्माण होते. म्हणून किमान दिवसातून १५ मिनिटे तरी नियमित व्यायाम केला पाहिजे. 

                                                  
      तर मित्रांनो ड्रग्स, गांजा, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा व इतर जिवघातक व्यसनांच्या आहारी गेल्या पेक्षा शिक्षण, पैसा, सुदृढ आरोग्याचे व्यसन पाळा. नवनविन गोष्टी शिका आणि पैसा कमाविण्याचे अधिक मार्ग शोधून काढा. एका मार्गावर कधिच अवलंबून राहू नका. नव्या गोष्टी मानवाला नवीन ऊर्जा निर्माण करते.

               दहा मिनिटाच्या आनंदासाठी संपूर्ण आयुष्य धोक्यात टाकू नका. 
तेच दहा मिनिट नवनविन गोष्टी शिकण्यात दया. एक छोटा बदल एक नवीन ऊर्जा निर्माण करते.

                                            

                 "A Small Step Towards Success" 

                                                  प्रथमेश राजु गणेशकर

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List