एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. वयाच्या अवघ्या काही वर्षात त्यानी व्यसनाला सुरूवात केली. दिवसातला बहुतांश वेळ त्याचा व्यसन करण्यात जायचा. थोरपुरूष सांगायचे वयवर्ष 20 ते 30 हे जीवन घडविण्याचं राहत असे. पण मात्र राम ने वयाच्या विसाव्या वर्षी पासुन सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. सिगरेट च्या आहारी तो अती जास्त प्रमाणात गेला होता. दररोज 60 रुपये तो त्यात घालवायचा. महिन्याला 1800 रुपये तसेच वर्षाला 21,600 रुपये धुव्याच्या रुपात उडून जायचे. आनंद हा मात्र काही वेळ असतो पण त्या व्यसनामध्ये लागलेला पैसा परत येत नाही. असेच काही वर्ष निघून गेले.
ते म्हणते ना 'देर आये पर दुरुस्त आये' त्याला त्याची चूक वयाच्या 30 व्या वर्षी कळली. जेव्हा हातात एक रुपया सुद्धा थांबत नव्हता. घरच्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. जबाबदारी माणसाला सर्व काही शिकवते. त्यानी ठरवले की हे योग्य नाही व तसेच स्वःतावर नियंत्रण ठेवले. विचार पक्का केला आणि 30 व्या वर्षीपासुन व्यसन करणे पूर्णपणे बंद केले. आणि तेच 1800 रुपये जे त्याचे महिन्याला व्यसनात जायचे त्या पैशाला चांगल्या मार्गी म्हणजे एका INDEX FUND / MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक केली. काही महिने त्याला खूप त्रास झाला, भरपूर समस्या त्याच्या समोर आल्या पण जेवढ्या जिद्दीने तो व्यसन करायचा तेवढ्याच जिद्दीने तो दर महिन्याला आपल्या पैशाची गुंतवणूक करायचा. त्याला हळू हळू आपले जुने दिवस आठवायला लागले. ते आठवून तो खूप निराश व्हायचा. आणि म्हणायचा की मी तेव्हाच गुंतवणूक केली असती तर आता सुखी झालो असतो. पण उशिरा का असो ना त्यानी शेवटी चांगला निर्णय घेतला.
पाहता पाहता वयवर्ष 60 पर्यंत त्यानी पगारातले पैसे शिल्लक काढून काही टक्क्याचा वार्षिक रिटर्न ने 14,25,600 रुपये पेक्षा अधिक रुपये शिल्लक केले. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की आपल्या जवळ म्हाताऱ्या वयात येवढी मोठी रक्कम आपण बचत केली. त्या मागची त्याची मेहनत आणि व्यसनावर नियंत्रण ठेवून त्याला हे सर्व शक्य झाले.
तसेच मित्रांनो सांगायचं झालं तर सिगारेट बनवणारी कंपनी ITC या कंपनीचा शेअर 2000 साली 18 रुपयाचा होता. पाहता पाहता 22 वर्ष निघून गेले आणि त्या शेअर ची किंमत 2022 व्या वर्षी 220 च्या जवळपास आहे. याला आपण उत्तम गुंतवणुकीची ताकद म्हणू शकतो. ( हा शेयर सल्ला म्हणून नाही तर फक्त एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडत आहे )
व्यसन तुमचे आरोग्यचं नाही तर संपत्तीला सुद्धा नुकसान पोहोचवते. आपल्या भविष्याचे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. आणि सुरुवात करा एका नवीन जीवनाची...
सुरक्षित राहा, निरोगी राहा....
प्रथमेश राजु गणेशकर
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box