भारतात लेबर किसान पार्टीने १ मे १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. त्यावेळी भारतात कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाचा झेंडा वापरण्यात आला होता. भारतात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. पण मात्र नोकरी म्हणजे गुलामगिरीच होय. सामान्यतः दहावी चे शिक्षण पूर्ण करुण ९९ टक्के मुले मूली नोकरी करण्याचा दिशेने वळतात. नोकरी करण्याचे कारण म्हणजेच घरची परिस्थिती बरोबर राहत नाही तसेच बाबांचा पगार घरच्या खरचांपेक्षा कमीच असतो आणि पुढील भवितव्यासाठी उच्च शिक्षणाला पैसा तर लागणारच ना. जसं जसं वय १८ च्या वर जाते तस-तसे घरच्यांची ईच्छा असते की मुलगा डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावा. आपल्याला या गरिबीतून दूर घेऊन जावा. त्यांच काय चुकलं हो ! सामान्य माणसाच्या जीवनात हेच मोठे ध्येय असते. कधी सुख तर कधी दुखः असच राहते हो सामान्य माणसाचे जीवन. प्रत्येकाला आयुष्यात एक एक पायरी चढून यश मिळत असते, एकदम तर कोणिही एकदम रातोरात मुकेश अंबानी किंवा रतन टाटांसारखे यशस्वी तर नाही होणार...
वेळ लागणार, दिवस येणार...
सर्वकाही बरोबर होणार...
बरोबर होणार म्हणजेच काय तर 'नोकरी'
नोकरी करून कधीच कोणीही श्रीमंत होत नाही. नोकरी करने म्हणजे फक्त मालकाचा खिचा भरविण्यासाठी काम करीत असलेले मजूरच होय. दिवस रात्र राब राब राबतो, कष्ट करून तो मालकाचा खिचा भरवितो. या सर्व मेहनतीचे फळ त्याला काय मिळते तर चिमुटभर पगार. त्यातही जर एक दिवस सुट्टी घेतली की पगारात कपात. कधी दहा मिनिट उशिरा कामावर पोहोचला की ना-ना प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. बोटावर मोजण्याइतके मालक या देशात राहतात की, जे आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा एक भाग समजतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. सुख असो की दुःख ते नेहमी त्यांच्याबरोबर राहतात.
तर अशी दुर्दशा होते नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची. नोकरी करण्यापेक्षा छोटे असो किंवा मोठे पण आपले साम्राज्य तयार करा. व्यवसाय छोटा असो का मोठा शेवटी व्यवसाय तो व्यवसायच असतो. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा MAKE IN INDIA व 'आत्मनिर्भर भारत' या सारखे अनेक सुविधा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी निर्माण केल्या आहे.
भारताचे नामंकित उद्योजक अमन गुप्ता, अश्र्निर ग्रोव्हर, अनुपम मित्तल, पियूष बंसल, नमिता थापर, विनिता सिंग व गजल अलघ यांच्या मार्गर्शनाखाली SHARK TANK INDIA सारख्या मालिकेमुळे अनेक छोट्या मोठ्या संकल्पना आपल्याला दिसायला येतात. या मालिकेतून घराघरात एक उद्योजक निर्माण होऊ लागले आहे. छोट्या व्यवसावरच मोठ्या व्यवसायाची सुरुवात होते. आपल्या भारत देशातील तरुण पिढी विदेशात जाऊन नोकरी करतात आणि विदेशाला पैसा तसेच त्यांना यश मिळवून देतात. व्यवसाय करण्याचे योग्य वय हे २० ते ३० वर्ष्यापर्यंत आहे. तरुण असल्याचा फायदा घ्या. जर ३० वर्षानंतर व्यवसाय सुरू केला तर अनेक अडचणी समोर येतात. लग्न असो, किंवा संसार त्यात माणूस बांधून राहतो त्यावतिरिक्त तरुण वयात व्यवसाय सुरू करावा. कारण २० ते ३० वर्ष हे धडपडीच असते जर कदाचित अपयश जरी आले तरी प्रयत्न करता येते.
पण जर प्रयत्नच नाही केले तर यश काय ? अन अपयश काय?
साधाणपणे पाहण्यास झाले की ३० वर्षापर्यंत युवावर्ग सरकारी नोकरीच्या शोधात राहतात आणि आपले अर्ध तरुणपण त्यातच घालवतात. तेच जर विसाव्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि ५ वर्ष त्यासाठी जीवतोड मेहनत केली तर कदाचित तोच व्यवसाय तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकतो. प्रयत्न करणे सोडू नका दहा अपयशानंतर ११ वेळा यश येऊ शकते. तरी प्रयत्न करत रहा. व्यवसायात अनेक संकटे येऊ शकते त्याला मात द्यायची ताकद असू द्या. नोकरी करणे म्हणजे 'गुलामगिरी' करणेच होय. आणि भारताची ओळख गुलामगिरी करणारा देश म्हणून झाली आहे. ते मग इंग्रांपासून असो की नोकरीपर्यंत. स्वतःच्या भविष्याचा पाया मजबूत करायचा असेल तर नोकरी शिवाय पर्याय नाही पण आयुष्यभर नोकरी करणे म्हणजे १९४७ शतकातला काळ निर्माण करणे होय.
“तर उठा, जागे व्हा आणि पहा की नोकरीच्या पलीकडे किती मोठे जग आहे आणि सुरूवात करा एका नवीन जीवनाची......”
"Wake up and see how big the world is beyond the job"
- प्रथमेश राजु गणेशकर
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box