"म्युच्युअल फंड" हा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये आपण दर महिन्याला निश्चित पैशांची गुंतवणूक करून भविष्यासाठी योग्य आणि सुरक्षित असे व्याज मिळण्यासाठी तयार केलेला मार्ग. तर आता आपण म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर म्युच्युअल फंड हे शेअर बाजार मधील फक्त एक भाग आहे. त्यामध्ये फरक एवढाच असतो कि, शेयर बाजार मध्ये आपल्याला वेळ देऊन तसेच स्वतः शिकून पैशाची गुंतवणूक करावी लागते. आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण एका प्रमाणित व्यक्तीला किंवा प्रमाणित कंपनीच्या माध्यमातून आपण आपले पैसे शेयर बाजार मध्ये गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये साधारणतः आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो. एक म्हणजे Lumpsum गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे SIP (Systematic Investment Plan).
गुंतवणूक तर करायची आहे पण योग्य कंपनी कशी ओळखावी ?
शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत असतांना सर्वात पहिला प्रश्न असा पडतो ते म्हणजे कोणत्या कंपनी च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची. कारण असंख्य कंपन्या म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा नोंदण्या झालेल्या आहेत. तर मग या सर्व कंपन्यामधून योग्य कंपनी कशी ओळखावी, तर याचे उत्तर सुद्धा आपल्याला कोणीही सांगणार नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या युगाची स्पर्धा. तो जर त्याचे यशस्वी होण्याचे मंत्र तुम्हाला सांगेल तर मग तुम्ही त्याच्या पेक्षा अधिक शक्तिशाली व्हाल. त्याच कारणाने कोणीही आपल्या मधील गुण कोणालाही शिकवत नाही. होय ! अशीच मानसिकता आहे आजच्या बदलत्या युगाची. तर मग प्रश्न आहे तर याचे उत्तर सुद्धा असेलच. त्याचे उत्तर म्हणजेच अस कि, याची सुद्धा माहिती आपल्यालाच काढावे लागेल. ते आपण अनेक पुस्तकांपासून तसेच गुगल देवताच्या च्या माध्यमातून काढू शकतो. एक सोपी उत्तर आहे कि, आपण ज्या कंपनी च्या वस्तू किंवा अनुभव जाणवला आहे अशाच कंपनी मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे.
म्युच्युअल फंड मध्ये पैश्यांची वाढ कशी होते ?
शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड असो या सर्वांची प्रगती नोंदणी झालेल्या कंपनी वर अवलंबून असते. जशी जशी कंपनी वाढेल त्याच प्रमाणे त्यांची विक्री सुद्धा वाढेल. आणि विक्री वाढली तर नक्कीच कंपनी चांगल्या प्रकारचे नफा मिळवू शकते, आणि जर कंपनीला नफा झाला तर त्या नफा मधील एक छोटासा भाग हा त्या कंपनी मधील गुंतवणूकदारांना व्याजाच्या रुपात मिळत असते.
शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंडामुळे भारत देशाला फायदा कसा ?
आता साहजिक आहे कि, जस जश्या भारताच्या कंपन्या वाढेल त्याच प्रमाणे भारत देश सुद्धा आर्थिकरित्या विकसित होणार. आपला भारत देश जर आर्थिकरित्या विकसित करायचा असेल तर मोठ्या कंपन्यांबरोबर छोट्या उद्योजकांना सुद्धा यावर अधिक भार देऊन आपल्या शहराला विकसित करावे लागेल. हीच खरी भारताची प्रगती म्हणून ओळखल्या जाईल.
लोकांचे शेयर बाजार, म्युच्युअल फंड बद्दल चे विचार ?
आता कस आहे, शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड या दोन्ही गुंतवणुकीबद्दल साधारणतः लोकांचे मत नकारात्मक असते ते म्हणजे गुंतवणूक म्हटलं म्हणजे त्यांच्या कढुन एकच उत्तर अपेक्षित असते ते म्हणजे शेयर बाजार मधून लोकांची फसवणूक होते, त्यामुळे आम्ही यात गुंतवणूक करत नाही. आता आपण त्यांच्याशी वाद केल्यापेक्षा त्यांनाच याबद्दल थोडी माहिती समजून सांगितली पाहिजे. या जगात प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायचं असत फक्त प्रश्न इथेच निर्माण होतो कि त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळत. त्यांच्या मनातील जर आपण शेयर बाजार बद्दल शंका काढल्या तर नक्कीच आपण काही तरी नवीन शिकू आणि आपला देश घडविण्यासाठी एक छोटा सहभाग करू.
गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी ?
सर्व तर वाचून झालं पण नक्की सुरुवात कुठुन करावी हाच प्रश्न आपल्याला पडला असेल. खरंच जर आपल्याला याबद्दल काही शिकून पैशाची गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिले त्या कंपनी बद्दल थोडी माहिती जमा करा. नेमक आपल्याला कोणत्या कंपनी मध्ये गुंतवणूक कराची आहे. योग्य कंपनीची जेव्हा निवळ झाली त्यानंतर आपण महिन्याला किती पैसा जमा करू शकतो याबद्दल विचार करून तीच रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. हेच जर आपण सरासरी काही वर्ष करत गेलो तर नक्कीच आपण वयाच्या ४० पर्येंत आर्थिकरित्या स्वतंत्र होऊ शकतो.
तर मग आजच सुरुवात करताय ना !
प्रथमेश राजु गणेशकर
( B.COM, D.TAX, GDC&A )
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box