Friday, October 28, 2022

शिक्षणाचा प्रभाव | POWER OF EDUCATION | The effect of education | The power of education

असे म्हणतात की, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. हे नक्की बरोबर आहे का ? मग आज या विषयावर चर्चा करूया. 

           मूलं जन्माला आली की त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे टाकले जाते, की माझा मुलगा / मुलगी भरपूर अभ्यास करून आमचे नाव मोठ करणार . अभ्यासाचं ओझं एवढं वाढते की लहान मुलांना त्यांची शाळेची बॅग जड वाटायला लागते. पण काय करणार ? हा नवा भारत आहे, जो जास्त शिकलेला आहे त्यालाच समाजात उच्च दर्जा दिला जातो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असायला पाहिजे. मग तो अभ्यास असो, किंवा मोबाईल फोन !

          शिक्षणातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात ज्या आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. शिक्षण हे सर्व काही नाही, पण शिक्षणापेक्षा दुसरे कोणते मार्ग आहे. आजकाल शिक्षणाचे सुद्धा प्रकार तयार होत आहेत. कोणी जास्त पैसे देऊन खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत, तर कोणी कमी पैसे देऊन सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत. शेवटी, शिक्षण ते शिक्षण आहे, काय ती सरकारी शाळा अन काय ती खाजगी शाळा?
          
        
     शिक्षण हे काय आहे ? ज्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनीअर या पदवीसाठी कित्येक वर्षे शिक्षण घेतले आणि ही पदवी मिळवली. त्यांना विचारा आणि त्या अभ्यासातून ते कुठे पोहोचले ते पहा. आयुष्यात कधीतरी डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्याकडे तर आपल्याला जावं लागतं, तेव्हाच आपल्याला खऱ्या शिक्षणाचा प्रभाव माहिती पडते. 
 
उच्च शिक्षणाने पुढील आयुष्यासाठी खूप काही शिकायला मिळते आणि तसे शिक्षण कधीच पैशाने विकत घेता येत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर योग्य शिक्षण, अधिक पैसा आणि निरोगी शरीर या गोष्टींचा एकाग्रतेने विचार करून यावर अंमल बजावणी केली पाहिजे.

      केवळ पालकांच्या दबावाखाली येऊन शिक्षण नाही तर, तर आपल्या उज्वल भविष्यात या शिक्षणाचा काय फायदा होईल याकडे लक्ष द्या. या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाण्यास नक्कीच मदत करतील.
     
प्रथमेश राजू गणेशकर
 (बी. कॉम, डी टॅक्स ) 

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List