मित्रांनो आजकाल सगळीकडे IPL ची जरा जास्तीच चर्चा होऊन राहिली आहे. होणार का बऱ नाही ! IPL चाहत्यांसाठी मुकेश अंबानी यांनी IPL चे सामने मोफत दाखवण्याचा आच्चर्यचकीत होणारा निर्णय घेतला. आणि त्यांचा हा निर्णय संपूर्ण क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाचा निर्णय होता. पण मित्रांनो IPL चे डिजिटल राइट्स मिळवण्यासाठी Viacom 18 ने एकूण २३ हजार ७५८ कोटी रुपये खर्च केले. आता साहजिक आहे कि, कुठलीही कंपनी असो एवढा खर्च करून काही गोष्ट ग्राहकांसाठी आणत असेल तर त्याची भरपाई सुद्धा ग्राहकांकडूनच करण्यात येईल. पण आपण पाहतो तर काय कि, IPL अगदी मोफत क्रिकेट चाहत्यांपर्येंत पोहोचवण्यात आला. आता एवढे पैसे खर्च करून आपल्याला मोफत मध्ये IPL दाखवून नेमक जिओ ला काय फायदा होतो. आणि हा फोर्मुला आपण आपल्या व्यवसायात अमलात आणू शकतो का ? तर यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया.
तर मित्रांनो सांगायचं झालं तर Viacom 18 यांचाच एक ब्रांड म्हणजेच ‘जिओ सिनेमा’ ज्याच्या माध्यमातून IPL चाहत्यापर्येंत पोहोचवण्यात आला. मागील वर्षा पर्येंत IPL पाहण्यासाठी चाहत्यांना वार्षिक सबस्क्रीपशन म्हणून पैसे मोजावे लागायचे. पण नेमक इथेच चाहत्यांची कमजोर बाजू पाहून ‘जिओ सिनेमा’ च्या माध्यमातून मोफत IPL प्रसारित करण्याचा निर्णय अंबानी आणि ग्रुप ने घेतला. हाच निर्णय त्यांच्यासाठी अगदी मोलाचा ठरला. जसे आपण काही वर्षाआधी पाहिलेच होते कि, अंबानी आणि ग्रुप ने जिओ च्या माध्यमातून टेलिकॉम कंपनीत येऊन संपूर्ण स्पर्धाच मिटवून टाकली होती. नेमक असेच आपल्याला IPL चे डिजिटल राइट्स घेऊन दिसलेच आहे. मित्रांनो साधारणतः IPL च्या एका सामन्याला १ करोड वरून अधिक चाहत्यांची गर्दी पाहण्यात दिसू येते. आणि जिओ सिनेमावर नवीन वैशिष्ट्ये सुद्धा चाहत्यांसाठी उपलब्ध केले आहे, ते म्हणजेच IPL १२ भाषेत प्रसारित असो किंवा 4K रिज़ॉल्यूशन असो किंवा अनेक दिशेने नी IPL चे सामने चाहत्यांपर्येंत पोहोचवण्यात आले असो. पण मित्रांनो अनेक सुविधा तसेच असंख पैसा खर्च करून जिओ ला नेमक मिळत तरी काय ?
तर मित्रांनो जिओ साठी कमाईचे बरेचसे साधन उपलब्द आले. सांगायचं झालचं तर जिओ सिनेमा ची सुरुवात २०१६ साली झाली होती पण नेमकी त्याला तेवढी प्रसिद्धी मिळालीच नाही. पण जसे जिओ सिनेमा च्या माध्यमातून IPL मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला तसेच हा निर्णय त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. तसेच IPL च्या पहिल्याच सामन्यात २.५ कोटी च्या जवळपास जिओ सिनेमाच्या ग्राहकांमध्ये वाढ झालेली दिसली. अशा कमी वेळातच चांगलीच ओळख निर्माण झाली. तसेच IPL पाहण्यार्यांचा जोश पाहून अनेक जाहिराती IPL सामन्याच्या मध्ये दाखवल्या जातात आणि इथेच जिओ सिनेमा ची खरी कमाई सुरु होती. अनेक मोठ-मोठ्या कंपनी जिथे जास्त ग्राहक असतात तिथेच आपल्या कंपनांची जाहिरात करतात आणि IPL ची वाढती ग्राहकांची गर्दी पाहून कंपन्या जिओ सिनेमा वरच जाहिराती प्रसारित करू लागल्या. तसेच मित्रांनो ग्राहकांना मोफत देऊन त्यांना त्या गोष्टीची सवय लावण्याचे प्रयत्न जिओ सिनेमा करीत आहे. असेही होऊ शकते कि, पुढील काही वर्षात आपल्याला जिओ सिनेमा पाहण्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागेल.
अशा सर्व गोष्टींमुळे जिओ सिनेमा हा प्रचंड वेगाने वाढत आहे. तर मित्रांनो आपण यामधून काही नवीन गोष्टी नक्कीच शिकून आपल्या व्यवसायात अमलात आणू शकतो. यावर जर आपण योग्य विचार करून जर चांगला निर्णय घेतला तर नक्कीच काही वर्षात आपण सुद्धा चांगला व्यवसाय उभा करू शकतो आणि आपल्या भारत देशातली बेरोजगारी दूर करू शकतो.
लेखक
प्रथमेश राजू गणेशकर


No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box