"पॉवर ऑफ इंवेस्टमेंट" हे तीन शब्द खूप काही सांगून जाते. इंवेस्टमेंट, इंवेस्टमेंट, इंवेस्टमेंट जिथे पाहा तिथे हाच टॉपिक ट्रेडिंग वर असतो. आता हाच टॉपिक ट्रेडिंग वर जाण्यामागाचे कारण आपल्याला याच तीन शब्दातच दिसून येते. इंवेस्टमेंट म्हटल म्हणजे पैसा आणि पैसा म्हटल म्हणजे मेहनत. सर्व काही एक दुसऱ्यासोबत जुळलेले आहे. मेहनत केलीच नाही तर पैसा कुठून येणार आणि पैसा नसला की इंवेस्टमेंट कशाची मग ?
पैशावीणा काही इंवेस्टमेंट करणे शक्य आहे का ?
त्याचे उत्तर म्हणजेच आजिबात नाही,
पण मुळात हे झाले जुने विचार...
आजच्या आधुनिक काळात सर्वच काही सोपी आहे. पैशाविना सुद्धा इंवेस्टमेंट करणे अगदी सोपी आहे. आता ते कसे तर आपण पुढे जाणून घेऊया....
तर आज आपण असा एक मार्ग पाहणार आहे ज्यामुळे अनेक सर्वसाधारण लोक सुद्धा अतिशय कोट्याधीश झालेत.
तर सर्व प्रथम यासाठी आपल्याला स्वतःवर विचार करावा लागेल, की अशी कोणती गोष्ट आहे जी मला दुसऱ्यापेक्षा अधिक चांगली जमते. सांगायचं झालं तर स्वतः मधला प्लस पॉइंट जर आपल्याला योग्य वेळी समजला पाहिजे.
कसं आहे जास्त पैसा असला की नक्कीच आपण कोट्यधीश होऊ शकतो. पण मात्र पैसा कधी पर्यंत टिकणार. कधी ना कधी तर तो संपणारच. म्हणून त्यापेक्षा अशा एका गोष्टीवर काम करा ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर रॉयल्टी मिळेल. इंवेस्टमेंट करायचंय असेल तर स्वतःवर करा, स्वतःचा कलेवर पैसा खर्च करा. नवनवीन गोष्टी शिकण्यात स्वतःला वेळ द्या. हीच तुमच्या आयुष्याची खरी इंवेस्टमेंट होऊ शकतो आणि नेमकी हीच इंवेस्टमेंट तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. ना कधी चोरी होण्याची भीती, तर ना कधी संपून जाण्याची भीती. नक्कीच या इंवेस्टमेंट ची पॉवर खूप मोठी अशी राहील. तर अशा गोष्टीवर काम करा आणि एक वेगळा अनुभव घ्या.
Skill development is the best source of investment.
प्रथमेश राजु गणेशकर
( B.COM, D.TAX )

No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box