Friday, June 10, 2022

दहावी आणि बारवीचा रिझल्ट लागला ! सल्यांपासून सावधान | 10th and 12th results are out! Beware of advice...

    वर्षभर अभ्यास करून अवघ्या तीन तासाचे प्रयत्न नक्कीच आपल्याला भविष्यापर्यंत अतिवेगाने पोहोचवत असते. दहावी असो की बारावी रिझल्ट लागल्यावर आपली धावपळच सुटते की आता पुढे काय करायचं?
 रिझल्ट लागल्यावर आपल्याला सल्ला देणारे असंख्य लोक आपल्याला आढळते. काही म्हणतात डॉक्टर हो, इंजिनिअर हो तर काही म्हणतात वकील हो. असे अनेक सल्ले देणारे लोक आपल्याला आढळते. ज्यांना त्यातलं काहीच माहिती नाही असे लोक सुध्दा आपल्याला सल्ले देत असतात. आणि त्या सल्ल्यांमुळे आपले डोक गोंधळून जाते. समजत नाही काय करावं तर. 
       आता मला सांगा पेपरसाठी अभ्यास तर आपणच केला आहे तर मग काय खरं ! अन काय खोटं ! आहे हे तर आपल्याला समजायला पाहिजे. त्यांनी म्हटल की ह्या क्षेत्रात जा छान आहे थोड कठीण आहे पण हे छान आहे, तर आपण लगेच धावपळ करतो त्या मार्गी जायला. जर अभ्यास आपणच केला तर आपल्याला सुद्धा माहीत असायला पाहिजे की काय आपल्याला उत्तम रित्या झेपणार. कशात आपण आपले करिअर घडवू शकतो. 
  पुढे काय करावं यातच आपण गोंधळून जातो. आणि मग चुकीचा निर्णय घेतो. चर्चा करायचीच असेल तर क्लासेस मधील आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक किंवा शिक्षिका राहतातच त्यांच्याशी चर्चा करा, जे आपल्या कार्यात यशस्वी झाले त्यांच्याशी चर्चा करा. यशस्वी लोकांसोबत चर्चा करा. आपल्याला नक्कीच त्यात यश मिळू शकते. दहावी नंतर बरेचशे रस्ते आपल्यासाठी मोकळे असतात. कला, वाणिज्य, विज्ञान, आय टी आय तसेच इंजिनियरिंग अशा अनेक क्षेत्रात आपण आपले भविष्य घडवू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही अनेक क्षेत्र आहेत. आपल्याला पुढे अनेक संकटे आपल्या सोमोरे येऊ शकते तर आपण भान राहून आपले करिअर निवडले पाहिजे. 

  योग्य चर्चा कोणाबरोबर करावी ? 
 
            क्लासेस मधील आपले शिक्षक किंवा शिक्षिका राहतात त्याच्याबरोबर चर्चा करायची त्यांना नक्कीच इतरांपेक्षा जास्त माहिती असते. कला वाणिज्य विज्ञान तसेच इंजिनियरिंग अशा क्षेत्रात जे यशवी झाले आहे त्यांच्यासोबत चर्चा करा. अनेक करिअर मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यायची. नक्कीच अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या कमी पडू शकते. शेवटी अभ्यास तर आपणच केला आणि करिअर आपल्यालाच घडवांव करावं लागतं. सर्वांकडून माहिती गोळा करून आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडावे. 

 तसेच बारावी उत्तीर्ण झालेल्यांना जवळपास माहितीच असते की आपण काय करू शकतो. आणि बारावी पासुन चे शिक्षण हे कदाचित दहावी च्या निर्णयावर अवलंबून असते. बारावी नंतर अनेक जबाबदारी आपल्या पुढे येतात. तसेच उच्च शिक्षणाला असंख्य असा पैसा सुध्दा लागतो. म्हणून जे आपल्याला झेपत असेल असेच क्षेत्र निवडावे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असे जे सर्विस इंडस्ट्रीज आणि सरकारी नोकरीची तयारी आपण दहावी पासूनच केली तर नक्कीच आपल्याला पुढे याचा फायदा होऊ शकतो. 

आणि जे विद्यार्थी व विद्यार्थीनी यात नापास सुद्धा झालेले आहेत त्यांनी निराश न होता अधिक मेहनतीने पुढील पेपरसाठी तयारी करायला आत्तापासूनच सुरूवात करायला हवी. आणि आपण कुठे कमी पडलो याचे नक्की भान असूनच आपण अभ्यास केला पाहिजे. जसे वाघ शिकार करण्यासाठी दोन पाऊले मागे घेऊन शिकार करतो असेच आपण नापास झालो की पुन्हा तयारी करायला हवी. पुन्हा एक नविन धेय ठेवायला हवे.

सर्व दहावी व बारावी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीचे मनपूर्वक अभिनंदन. 


     प्रथमेश राजु गणेशकर

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List