भारताच्या इतिहासात प्रगतीची सर्वात मोठी अशी लाट अवघ्या काही वर्षातच येणार आहे त्याचे कारण असे की, भारताच्या लोकसंख्येत 22 टक्के तरुण युवावर्ग ( वयोगट 18-29 वर्षे ) आहेत, यांना आपण भारताची खरी युवाशक्ती देखील म्हणता येईल. तरीही बहुतांश टक्के युवाशक्ती व्यसनांच्या आहारी गेले आहेत. कुठलेही व्यसन माणसाला पैशांनी तसेच शरीराने कमजोर करून टाकतो. तर आज आपण एका कथेच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणुन घेऊया ज्या आपल्याला आपल्या पुढील भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यांचा आपल्या भावी जीवनात एक मुख्य सहभाग राहणार आहे..
एका गावात श्याम नावाचा मुलगा राहत होता. गावातला सर्वात श्रीमंत सरपंचाचा एकुलता एक मुलगा. आणि जसा श्याम तसेच त्याचे मित्रगण. ते म्हणतात ना की, वाईट सोबतीचा असर खूप वाईट असतो. वयाच्या अवघ्या काही वर्षात त्यानी व्यसनाला सुरूवात केली. दिवसातला बहुतांश वेळ तो व्यसन करायचा. त्याच्या शाळेतील शिक्षक त्याला नेहमी सांगायचे वयवर्ष 20 ते 30 हे जीवन घडविण्याचं राहत असे. हेच १० वर्ष आपले खरे आयुष्य घडवत असे. पण मात्र श्याम ने वयाच्या विसाव्या वर्षी पासुन आपल्या मित्रांना पाहून सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. सिगरेट च्या आहारी तो जास्त प्रमाणात गेला होता. दररोज 60 रुपये तो त्यात घालवायचा. महिन्याला 1800 रुपये तसेच वर्षाला त्याचे 21,600 रुपये धुव्याच्या रुपात उडून जायचे. आनंद हा मात्र काही वेळ असतो पण त्या व्यसनामध्ये लागलेला पैसा परत येत नाही. असेच करता करता काही वर्ष निघून गेले.
ते म्हणतात ना 'देर आये पर दुरुस्त आये' हळू हळू जसे त्याचे पैसे संपायला लागले तसे तसे त्याचे व्यसनी मित्र त्याचा साथ सोडू लागले. एक दिवस आला तो एकटाच स्वतःचा विचार करू लागला की, आपले बाबा गावचे सरपंच आणि आपण त्यांनी आयुष्यात कमावलेली पूर्ण इज्जत आपण वाया घालवली. त्याला त्याची चूक वयाच्या 30 व्या वर्षी कळली. जेव्हा हातात एक रुपया सुद्धा थांबत नव्हता. घरच्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. जबाबदारी माणसाला सर्व काही शिकवते.
त्यानी ठरवले की, जे काही १० वर्षात झाले ते बरोबर नाही झाले व तसेच स्वःतावर नियंत्रण ठेवण्यास सुरू केले. विचार पक्का केला आणि 30 व्या वर्षीपासुन व्यसन करणे पूर्णपणे बंद केले. आणि तेच 1800 रुपये जे त्याचे महिन्याला व्यसनात जायचे त्या पैशाला योग्य मार्गी म्हणजे एका INDEX FUND / MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक सुरू केली. काही महिने त्याला त्रास झाला, भरपूर समस्या त्याच्या समोर आल्या पण जेवढ्या जिद्दीने तो व्यसन करायचा तेवढ्याच जिद्दीने तो दर महिन्याला आपल्या पैशाची गुंतवणूक करायचा. त्याला हळू हळू आपले जुने दिवस आठवायला लागले. ते आठवून तो खूप निराश व्हायचा. आणि म्हणायचा की मी तेव्हाच जर व्यसनांचा दूर राहून गुंतवणूक केली असती तर आता सुखी झालो असतो. पण उशिरा का असो ना त्यानी शेवटी चांगला निर्णय घेतला होता.
पाहता पाहता वयवर्ष 60 पर्यंत त्यानी पगारातले पैसे शिल्लक काढून काही टक्क्याचा वार्षिक रिटर्न ने 14,25,600 रुपये पेक्षा अधिक रुपये शिल्लक केले. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की आपल्या जवळ म्हाताऱ्या वयात येवढी मोठी रक्कम आपण बचत केली. त्या मागची त्याची मेहनत आणि व्यसनावर नियंत्रण ठेवून त्याला हे सर्व शक्य झाले.
तसेच मित्रांनो सांगायचं झालं तर सिगारेट बनवणारी कंपनी ITC या कंपनीचा शेअर 2000 साली 18 रुपयाचा होता. पाहता पाहता 22 वर्ष निघून गेले आणि त्या शेअर ची किंमत 2022 व्या वर्षी ३३० रुपयाचा च्या जवळपास आहे. याला आपण उत्तम गुंतवणुकीची ताकद म्हणू शकतो. ( हा शेयर सल्ला म्हणून नाही तर फक्त एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडत आहे )
व्यसन तुमचे आरोग्यचं नाही तर संपत्तीला सुद्धा नुकसान पोहोचवते. व्यसनाला तुमच्या जीवनावर हावी होऊ देण्यापेक्षा तुम्ही व्यसनाचा दूर राहा. आपल्या भविष्याचे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. आपले दिवस आपणच बदलू शकतो, निच्छय करा आणि आजपासूनच सुरूवात करा एका नवीन जीवनाची...
प्रथमेश राजु गणेशकर
( बीकॉम, डी.टॅक्स )
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box