Thursday, March 23, 2023

जगातील सर्वात शक्तिशाली गुंतवणूक !

 मित्रांनो गुंतवणूक म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात. ते मग पैशाची बचत असो ! फिक्स्ड डिपॉजिट असो! शेअर बाजार असो किंवा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. आपल्याकडे पैसे आले की आपण गोंधळून जातो की पैसे कुठे गुंतवायचे आणि त्याच नादातचं ते पैसे केव्हा खर्च होऊन जातात ते आपल्याच नाही कळत. बहुतांश लोकांसोबत असचं होतात, यासाठी आपण "कोन बनेगा करोड़पति" सारखे असंख्य उदाहरण पाहू शकतो की, लाखो-करोडो पैसे जिंकतात पण काही वर्षात पुन्हा ते गरिबीच्या जाळ्यात येऊन अडकतात. तर मित्रांनो या सर्व चुकांसाठी नेमक कोन जबाबदार असतं ? कसं आहे पैसा तर कोणीही देत पण पैशाला कशाप्रकारे वापरलं पाहिजे नेमकं हेच कोणी सांगत नाही. हीच सर्वात मोठी खंत निर्माण झाली आहे.




आज अशाच एका शक्तिशाली गुंतवणूकीबद्दल जाणून घेऊया. ही गुंतवणूक अतिशय जुनी असून आजही सर्वात जास्त मान यालाच दिले जाते, ते म्हणजेच "व्यवसाय". मित्रांनो सांगायचं झालं तर व्यवसाय ही अशी एक गुंतवणूक आहे की, ज्यापासून सर्वसामान्य लोक दूर धावतात. असं काय आहे व्यवसायात ? आपण मराठी माणसं फक्त इतरांवर टीका करण्यात आपले आयुष्य घालवतो. फक्त थोडीशी मेहनत घेऊन आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य मजबूत बनवू शकतो. मग अशी जोखीम घ्यायला पाहिजे ना ! 

आता काहीजण म्हणतात की, व्यवसाय करायसाठी खूप भांडवल लागते ? व्यवसाय उभा करायला खूप दिवस लागतात ? मग आम्ही यशस्वी होऊ का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. मित्रांनो मनात जर जिद्ध असली तर आपण कमी भांडवलात सुद्धा चांगला व्यवसाय उभा करू शकतो. आणि मला एक सांगा आपण जन्मतः पासूनच धावायला शिकलो का ? असचं असते व्यायवसायच त्याला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतात आणि एकदा चिकाटीने व्यवसाय सुरू झाला आणि नवीन शिकायची जिद्द असली तर नक्कीच आपण सुद्धा यात यशस्वी होऊच शकतो. 

      व्यवसाय कुठला करावा ? हा जर प्रश्न तुम्हाला उद्दभवत असेल तर, सर्वात आधी कुठल्याही व्यवसायाचे कॉपी करून व्यवसाय करू नका. आपण काय करतो दुसऱ्याचा व्यवसाय पाहतो आणि त्याची प्रगती पाहून आपल्याला सुद्धा तेच करायची इच्छा होते आणि आपण तेच करतो. या गोष्टी आपण नजरंदाज केल्या तर नक्कीच आपण चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. कुठलीही एक समस्या पहा आणि ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याला व्यवसायात रूपांतर करा. नक्कीच कधीही न संपणारा व्यवसाय म्हणून सुरू होईल. अशाप्रकारेचं आपण व्यवसायाची सुरुवात करू शकतो.

     मित्रांनो व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टी अगदी एकही रुपया न घेता व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान तुमच्या साठी "Prathamesh Ganeshkar" या यूट्यूब चॅनल वर घेऊन येत आहे. तर मग आज पासूनच शिकू आणि आपला हक्काचा व्यवसाय सुरू करू आणि भारत देशासाठी रोजगार निर्माण करू.



     प्रथमेश राजु गणेशकर 

( B. Com, D.TAX, GDC&A )



No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box

My Blog List