Saturday, January 27, 2024

LEGAL TIPS FOR EVERY ENTREPRENEURS

नमस्ते दोस्तों।

यदि आप कोई भी व्यापार करने वाले हैं या इसके बारे में सोच रहे हैं तो आज हम देखेंगे कि, किन लीगल टिप्स का उपयोग करके हम अपना व्यापार खड़ा कर सकते है । आज हम विस्तार में देखेंगे कि, व्यापार करने के लिए कोनसी चीजों के ऊपर हमे अभ्यास करना पड़ेगा।



दोस्तों यदि आप अपना व्यापार खड़ा करने के बारे में सोच रहे हैं तो सबसे पहिले आपको इन ८ चीजों के ऊपर अभ्यास करना चाहिए।

1) Business Structure:- दोस्तों बिजनेस के कई सारे प्रकार होते है, जिनमे से सोल प्रोपराइटर, पार्टनरशिप फर्म, को-ऑपरेटिव सोसायटी, लिमिटेड लायबिलिटी फर्म, सर्विसेस फर्म और अन्य प्रकारके व्यापार हम कर सकते है।

2) Contracts And Agreements :- Indian Contract Act के माध्यम से हम अपने व्यापार में सफलतापूर्वक कॉन्ट्रैक्ट्स और एग्रीमेंट कर सकते है। इस एक्ट में हमें कॉन्ट्रैक्ट कैसे किया जाता है से लेकर कॉन्ट्रैक्ट से जुड़ी सभी बातों को विस्तार में बताया है। आप इसका अपने व्यापार में जरूर उपयोग करें।

3) Employment Law :- दोस्तों हमारे व्यापार में हमें कितने मजदूर चाहिए और कितने Employee's चाहिए इसके बारे में जरूर सोचना चाहिए। और साथ ही, Employment Law का उपयोग करके अपने Employee's को अच्छी सुविधा और सुरक्षा प्रदान करे।

4) Dispute Authority :- दोस्तों कई सारे कंपनी में इंटरनल और एक्सटर्नल डिस्प्यूट/ वाद होते है। यदि यह वाद कंपनी के बाहर आते है तो यह कंपनी के लिए बहुत शर्मानाद बाद है। इससे बचने के लिए हमे अपने कंपनी में एक डिस्प्यूट अथॉरिटी तयार करनी पड़ेगी। और सभी विवाद कंपनी के अंदर ही सफलता पूर्वक इसका निपटारा करना चाहिए।

5) Privacy Policy :- दोस्तों सबसे महत्वपूर्ण भूमिका हमारे कस्टमरों की होती है। अपने कस्टमर हमरे लिए भगवान का रूप होते है। इसलिए उनका डाटा हमे किसको नही देना है। और उस डाटा का गलत तरीके से उपयोग न हो इसकी भी जांच करनी चाहिए।

6) licenses And Permit :- दोस्तों यदि आप अपना व्यापार खड़ा कर रहे हो तो इसका लाइसेंस जरूर निकल लेवे। इसका प्रभाव आपके बिजनेस के ऊपर अच्छा हो सकता है। और कोई भी आपके उपर उंबली नही उठा सकता है। इसलिए अपने व्यापार का लाइसेंस और परमिट जरूर निकल ले।

7) Intellectual Property Rights :- दोस्तों आपके व्यवसाय में सबसे बड़ा रोल मॉडल अपना प्रोडक्ट होता है। और अपने प्रोडक्ट और इसके नाम को प्रोटेक्ट करने के लिए हमे Intellectual Property Rights का रजिस्ट्रेशन जरूर कर लें। क्योंकि हमारे व्यवसाय, व्यापार, बिजनेस का नाम और प्रोडक्ट ये हमारी गुडविल होती है।

8) Rules And Regulations :- जाते जाते आप जिस भी राज्य ने अपना व्यापार खड़ा कर रहे हो । उस राज्य के नियम और शर्तें अच्छे तरीकेसे जान ले। और ऊपर अमल करे। दोस्तों एक बात हमेशा याद रखे की, हमारे व्यवसाय के वजय से किसी भी राज्य का कोई भी नियम नहीं टूटना चाहिए । यदि नियम टूटते है तो इसका भरी जुर्माना आपके उपर लगाया जा सकता है।


यदि आप अपना व्यापार खड़ा कर रहे हैं तो इन चीजों का जरूर से पालन करे और अपने व्यापार को नए ऊंचाई पर लेके जाए। और यदि आपको व्यवसाय, व्यापार, बिजनेस के बारे में और भी जानकारी चाहिए तो PrathamGuru इस यूट्यूब चैनल से जरूरी जुड़े और अपना एक छोटा बिजनेस आज ही शुरू करें।


#business

#badabusiness

#businessskillsforentrepreneurs

#howtostartabusiness

#entrepreneur

#fundraisingforstartupbusiness

#businesstips

#legalchecklistforstartingabusiness

#fundraisingforbusiness

#fundraisingforbusinessstartup

#businesstipsforsuccess

#businessgrowthtips

#businesskeliyepaisekaiselaye

#tipsforbusinessgrowthinhindi

#kampaisomebusinesskaisekare

#howtoraisefundsforbusiness

#businessideas

Friday, May 5, 2023

जिओ चा मास्टर प्लान

 मित्रांनो आजकाल सगळीकडे IPL ची जरा जास्तीच चर्चा होऊन राहिली आहे. होणार का बऱ नाही ! IPL चाहत्यांसाठी मुकेश अंबानी यांनी IPL चे सामने मोफत दाखवण्याचा आच्चर्यचकीत होणारा  निर्णय घेतला. आणि त्यांचा हा निर्णय संपूर्ण क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाचा निर्णय होता. पण मित्रांनो IPL चे डिजिटल राइट्स मिळवण्यासाठी Viacom 18 ने एकूण २३ हजार ७५८ कोटी रुपये खर्च केले. आता साहजिक आहे कि, कुठलीही कंपनी असो एवढा खर्च करून काही गोष्ट ग्राहकांसाठी आणत असेल तर त्याची भरपाई सुद्धा ग्राहकांकडूनच करण्यात येईल. पण आपण पाहतो तर काय कि, IPL अगदी मोफत क्रिकेट चाहत्यांपर्येंत पोहोचवण्यात आला. आता एवढे पैसे खर्च करून आपल्याला मोफत मध्ये IPL दाखवून नेमक जिओ ला काय फायदा होतो. आणि हा फोर्मुला आपण आपल्या व्यवसायात अमलात आणू शकतो का ? तर यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया.



तर मित्रांनो सांगायचं झालं तर Viacom 18 यांचाच एक ब्रांड म्हणजेच ‘जिओ सिनेमा’ ज्याच्या माध्यमातून IPL चाहत्यापर्येंत पोहोचवण्यात आला. मागील वर्षा पर्येंत IPL पाहण्यासाठी चाहत्यांना वार्षिक सबस्क्रीपशन म्हणून पैसे मोजावे लागायचे. पण नेमक इथेच चाहत्यांची कमजोर बाजू पाहून ‘जिओ सिनेमा’ च्या माध्यमातून मोफत IPL प्रसारित करण्याचा निर्णय अंबानी आणि ग्रुप ने घेतला. हाच निर्णय त्यांच्यासाठी अगदी मोलाचा ठरला. जसे आपण काही वर्षाआधी पाहिलेच होते कि, अंबानी आणि ग्रुप ने जिओ च्या माध्यमातून टेलिकॉम कंपनीत येऊन संपूर्ण स्पर्धाच मिटवून टाकली होती. नेमक असेच आपल्याला IPL चे डिजिटल राइट्स घेऊन दिसलेच आहे. मित्रांनो साधारणतः IPL च्या एका सामन्याला १ करोड वरून अधिक चाहत्यांची गर्दी पाहण्यात दिसू येते. आणि जिओ सिनेमावर नवीन वैशिष्ट्ये सुद्धा चाहत्यांसाठी उपलब्ध केले आहे, ते म्हणजेच IPL १२ भाषेत प्रसारित असो किंवा 4K रिज़ॉल्यूशन असो किंवा अनेक दिशेने नी IPL चे सामने चाहत्यांपर्येंत पोहोचवण्यात आले असो. पण मित्रांनो अनेक सुविधा तसेच असंख पैसा खर्च करून जिओ ला नेमक मिळत तरी काय ?

तर मित्रांनो जिओ साठी कमाईचे बरेचसे साधन उपलब्द आले. सांगायचं झालचं तर जिओ सिनेमा ची सुरुवात २०१६ साली झाली होती पण नेमकी त्याला तेवढी प्रसिद्धी मिळालीच नाही. पण जसे जिओ सिनेमा च्या माध्यमातून IPL मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला तसेच हा निर्णय त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. तसेच IPL च्या पहिल्याच सामन्यात २.५ कोटी च्या जवळपास जिओ सिनेमाच्या ग्राहकांमध्ये वाढ झालेली दिसली. अशा कमी वेळातच चांगलीच ओळख निर्माण झाली. तसेच IPL पाहण्यार्यांचा जोश पाहून अनेक जाहिराती IPL सामन्याच्या मध्ये दाखवल्या जातात आणि इथेच जिओ सिनेमा ची खरी कमाई सुरु होती. अनेक मोठ-मोठ्या कंपनी जिथे जास्त ग्राहक असतात तिथेच आपल्या कंपनांची जाहिरात करतात आणि IPL ची वाढती ग्राहकांची गर्दी पाहून कंपन्या जिओ सिनेमा वरच जाहिराती प्रसारित करू लागल्या. तसेच मित्रांनो ग्राहकांना मोफत देऊन त्यांना त्या गोष्टीची सवय लावण्याचे प्रयत्न जिओ सिनेमा करीत आहे. असेही होऊ शकते कि, पुढील काही वर्षात आपल्याला जिओ सिनेमा पाहण्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागेल.




अशा सर्व गोष्टींमुळे जिओ सिनेमा हा प्रचंड वेगाने वाढत आहे. तर मित्रांनो आपण यामधून काही नवीन गोष्टी नक्कीच शिकून आपल्या व्यवसायात अमलात आणू शकतो. यावर जर आपण योग्य विचार करून जर चांगला निर्णय घेतला तर नक्कीच काही वर्षात आपण सुद्धा चांगला व्यवसाय उभा करू शकतो आणि आपल्या भारत देशातली बेरोजगारी दूर करू शकतो.

लेखक

प्रथमेश राजू गणेशकर


Thursday, March 23, 2023

पॉवर ऑफ इंवेस्टमेंट

 "पॉवर ऑफ इंवेस्टमेंट" हे तीन शब्द खूप काही सांगून जाते. इंवेस्टमेंट, इंवेस्टमेंट, इंवेस्टमेंट जिथे पाहा तिथे हाच टॉपिक ट्रेडिंग वर असतो. आता हाच टॉपिक ट्रेडिंग वर जाण्यामागाचे कारण आपल्याला याच तीन शब्दातच दिसून येते. इंवेस्टमेंट म्हटल म्हणजे पैसा आणि पैसा म्हटल म्हणजे मेहनत. सर्व काही एक दुसऱ्यासोबत जुळलेले आहे. मेहनत केलीच नाही तर पैसा कुठून येणार आणि पैसा नसला की इंवेस्टमेंट कशाची मग ? 

पैशावीणा काही इंवेस्टमेंट करणे शक्य आहे का ?

त्याचे उत्तर म्हणजेच आजिबात नाही,

पण मुळात हे झाले जुने विचार...

आजच्या आधुनिक काळात सर्वच काही सोपी आहे. पैशाविना सुद्धा इंवेस्टमेंट करणे अगदी सोपी आहे. आता ते कसे तर आपण पुढे जाणून घेऊया....



तर आज आपण असा एक मार्ग पाहणार आहे ज्यामुळे अनेक सर्वसाधारण लोक सुद्धा अतिशय कोट्याधीश झालेत. 

तर सर्व प्रथम यासाठी आपल्याला स्वतःवर विचार करावा लागेल, की अशी कोणती गोष्ट आहे जी मला दुसऱ्यापेक्षा अधिक चांगली जमते. सांगायचं झालं तर स्वतः मधला प्लस पॉइंट जर आपल्याला योग्य वेळी समजला पाहिजे.

कसं आहे जास्त पैसा असला की नक्कीच आपण कोट्यधीश होऊ शकतो. पण मात्र पैसा कधी पर्यंत टिकणार. कधी ना कधी तर तो संपणारच. म्हणून त्यापेक्षा अशा एका गोष्टीवर काम करा ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर रॉयल्टी मिळेल. इंवेस्टमेंट करायचंय असेल तर स्वतःवर करा, स्वतःचा कलेवर पैसा खर्च करा. नवनवीन गोष्टी शिकण्यात स्वतःला वेळ द्या. हीच तुमच्या आयुष्याची खरी इंवेस्टमेंट होऊ शकतो आणि नेमकी हीच इंवेस्टमेंट तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. ना कधी चोरी होण्याची भीती, तर ना कधी संपून जाण्याची भीती. नक्कीच या इंवेस्टमेंट ची पॉवर खूप मोठी अशी राहील. तर अशा गोष्टीवर काम करा आणि एक वेगळा अनुभव घ्या. 

Skill development is the best source of investment.


प्रथमेश राजु गणेशकर

( B.COM, D.TAX )

जगातील सर्वात शक्तिशाली गुंतवणूक !

 मित्रांनो गुंतवणूक म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतात. ते मग पैशाची बचत असो ! फिक्स्ड डिपॉजिट असो! शेअर बाजार असो किंवा अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. आपल्याकडे पैसे आले की आपण गोंधळून जातो की पैसे कुठे गुंतवायचे आणि त्याच नादातचं ते पैसे केव्हा खर्च होऊन जातात ते आपल्याच नाही कळत. बहुतांश लोकांसोबत असचं होतात, यासाठी आपण "कोन बनेगा करोड़पति" सारखे असंख्य उदाहरण पाहू शकतो की, लाखो-करोडो पैसे जिंकतात पण काही वर्षात पुन्हा ते गरिबीच्या जाळ्यात येऊन अडकतात. तर मित्रांनो या सर्व चुकांसाठी नेमक कोन जबाबदार असतं ? कसं आहे पैसा तर कोणीही देत पण पैशाला कशाप्रकारे वापरलं पाहिजे नेमकं हेच कोणी सांगत नाही. हीच सर्वात मोठी खंत निर्माण झाली आहे.




आज अशाच एका शक्तिशाली गुंतवणूकीबद्दल जाणून घेऊया. ही गुंतवणूक अतिशय जुनी असून आजही सर्वात जास्त मान यालाच दिले जाते, ते म्हणजेच "व्यवसाय". मित्रांनो सांगायचं झालं तर व्यवसाय ही अशी एक गुंतवणूक आहे की, ज्यापासून सर्वसामान्य लोक दूर धावतात. असं काय आहे व्यवसायात ? आपण मराठी माणसं फक्त इतरांवर टीका करण्यात आपले आयुष्य घालवतो. फक्त थोडीशी मेहनत घेऊन आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य मजबूत बनवू शकतो. मग अशी जोखीम घ्यायला पाहिजे ना ! 

आता काहीजण म्हणतात की, व्यवसाय करायसाठी खूप भांडवल लागते ? व्यवसाय उभा करायला खूप दिवस लागतात ? मग आम्ही यशस्वी होऊ का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. मित्रांनो मनात जर जिद्ध असली तर आपण कमी भांडवलात सुद्धा चांगला व्यवसाय उभा करू शकतो. आणि मला एक सांगा आपण जन्मतः पासूनच धावायला शिकलो का ? असचं असते व्यायवसायच त्याला सुद्धा थोडा वेळ द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतात आणि एकदा चिकाटीने व्यवसाय सुरू झाला आणि नवीन शिकायची जिद्द असली तर नक्कीच आपण सुद्धा यात यशस्वी होऊच शकतो. 

      व्यवसाय कुठला करावा ? हा जर प्रश्न तुम्हाला उद्दभवत असेल तर, सर्वात आधी कुठल्याही व्यवसायाचे कॉपी करून व्यवसाय करू नका. आपण काय करतो दुसऱ्याचा व्यवसाय पाहतो आणि त्याची प्रगती पाहून आपल्याला सुद्धा तेच करायची इच्छा होते आणि आपण तेच करतो. या गोष्टी आपण नजरंदाज केल्या तर नक्कीच आपण चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. कुठलीही एक समस्या पहा आणि ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याला व्यवसायात रूपांतर करा. नक्कीच कधीही न संपणारा व्यवसाय म्हणून सुरू होईल. अशाप्रकारेचं आपण व्यवसायाची सुरुवात करू शकतो.

     मित्रांनो व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टी अगदी एकही रुपया न घेता व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान तुमच्या साठी "Prathamesh Ganeshkar" या यूट्यूब चॅनल वर घेऊन येत आहे. तर मग आज पासूनच शिकू आणि आपला हक्काचा व्यवसाय सुरू करू आणि भारत देशासाठी रोजगार निर्माण करू.



     प्रथमेश राजु गणेशकर 

( B. Com, D.TAX, GDC&A )



वित्तीय शिक्षा ( Financial Education ) क्यू जरुरी है ?

 वित्तीय शिक्षा ( Financial Education ) क्यू जरुरी है ?


दोस्तों आजकाल पैसा तो हर कोई कमा रहा हैं | लेकीन उसमेसे कुछ ही लोग पैसे को सही तरीके से संभाल पाते है । पैसा होना ये जरूरी नहीं है पर पैसोको संभालते आना चाहिए ये ज्यादा जरूरी है । हमे बचपन से सिखाया जाता है की, अच्छी पढ़ाई करो, अच्छी नौकरी करो और खूब पैसा कमाओ । पर अपने भारत देश में पैसो को किस तरह से संभालना है ! यही बात नही सिखाई जाती है और इसके कारण ही भारत देश आर्थिक रूप से विकसित नहीं हो पा रहा है । कुछ छोटीसी गलतियां रहती है की जो हमे बिल्कुल नहीं करनी चाहिए । तो आज हम फिक्स डिपॉजिट के बारे में कुछ नया जानेंगे । 



सोचो अगर आपके पास 1,00,000 रुपये आते हैं और आप इसे निवेश करना चाहते हैं, तो आपके और आपके परिवार के लिए पहला सवाल यह उठता है कि, उस 1,00,000 रुपये को कहां निवेश करें? अब आम तौर पर केवल एक ही जवाब की उम्मीद की जाती है ! "बैंक एफडी" जिसे फिक्स डिपॉजिट भी कहा जाता है। फिर तय मुताबिक हम बैंक जाते हैं और अपने पैसों की एफडी करते हैं। इससे सालाना हमे 5 से 6 फीसदी ब्याज मिलता है, इसलिए हम बैंक में एफडी करते हैं। लेकिन क्या होगा अगर मैं कहूं कि निवेश का यह तरीका गलत है? क्या आप विश्वास कर सकते हैं !


तो चलिए आज कुछ नया सीखते हैं और अपने वित्तीय ज्ञान को बढ़ाते हैं।


   तो 99 फीसदी लोग एफडी के बारे में ही क्यों सोचते हैं ? इसके पिछेका कारण यह है कि इसमें किसी भी प्रकार का खतरा नहीं है और सरकार का इस पर नियंत्रण होता है, लेकिन क्या ऐसा करना हमें महंगा पड़ सकता है? इसका कारण यह है कि भारत की महंगाई दर सालाना 6 फीसदी के आसपास मंडरा रहा है। सोचो अगर आपने 1 साल पहले 100 रुपए की कोई चीज खरीदते हैं तो आप पाएंगे कि आज वह 106 रुपए की हो गई है। इसके पीछे का कारण महंगाई है जो दिन-ब-दिन बढ़ती ही जा रही है। वहीं कुछ लोग इसका ठीकरा सरकार पर मढ़ देते हैं। देखिए, सरकार चाहे जो भी हो, महंगाई तो बढ़ेगी ही | जिस तरह आप उम्मीद करेंगे कि मेरा वेतन हर साल थोड़ा बढ़ जाएगा, उसी तरह सामानों की कीमतें भी बढ़ रही हैं। तो अब आप क्या सरकार को दोष दोगे? मेरी राय है कि सरकार को दोष देने का कोई मतलब नहीं है वह उनकी जगह सही है। तो फिर हमें अपनी कमाई बढ़ानी होगी।


जैसा कि मैंने आपको ऊपर बताया कि 100 की एक चीज दूसरे साल में 106 रुपये की हो गई है और साथ ही हम अपना पैसा बैंक में FD कर रहे हैं, वह भी हमें केवल 5 प्रतिशत ब्याज दे रहा है। उदा. अगर आपने 1 साल पहले बैंक में 100 रुपये की एफडी कराई है तो इस साल 5 फीसदी ब्याज पर 105 रुपये हो गई होगी न? अब आपको अपने दिमाग में चल रहे इस सवाल का जवाब मिल गया होगा कि आखिर पैसा हमारे पास क्यों नहीं टिक पाता है ?


तो क्या है जवाब, क्या हमें अपना पैसा FD में रखना चाहिए? आपको शेयर बाजार के बारे में जरूर कही न कही तो सुना ही होगा। मैं आपको इसमें निवेश करने के लिए नहीं कह रहा हूं | म्यूचुअल फंड ये शेयर बाजार का एक हिस्सा है जिसमें हम एफडी की तरह अपना पैसा निवेश कर सकते हैं। जैसे-जैसे भारतीय अर्थव्यवस्था बढ़ेगी, जैसे-जैसे भारत आगे बढ़ेगा, हमारा पैसा भी बढ़ेगा। आपको कुछ सवाल आ रहा होंगा की ऐसा कैसे? तो इससे पहले आपको थोड़ा यह समझने की जरूरत है, कि शेयर बाजार कैसे काम करता है। भारत की बड़ी कंपनियों को कंपनी को आगे बढ़ाने के लिए पैसों की जरूरत होती है और उस पैसे को निवेशक शेयर बाजार के जरिए शेयर बाजार में लगाते हैं। शेयर बाजार में कई सरकारी कंपनियां भी हैं।


तो इस तरह म्यूच्यूअल फण्ड काम करता है। बाकी पैसा आपका है ! समझ आपकी है! और फैसला भी आपका है कि कौन सा निवेश आपके लिए बेहतर है। मैं यह नहीं कह रहा कि एफडी गलत है लेकिन हम इसमें पैसा जमा कर सकते हैं न कि निवेश कर सकते हैं। एफडी में हमें उतना ही पैसा रखना चाहिए जितना हमें इमरजेंसी में चाहिए | जो हमारी जरूरत को पूरा कर सके। और थोड़ा रिस्क लेते हुए हमें भी अपना कुछ पैसा म्यूच्यूअल फण्ड में अच्छी कंपनियों में निवेश करना चाहिए। एक छोटा सा रिस्क आपके जीवन को बेहतर बना सकता है। 


प्रथमेश राजू गणेशकर

( बि.कॉम / डी.टँक्स / जी.डी.सी ॲंड ए )



Thursday, December 8, 2022

म्यूचुअल फंड क्या है?

 म्यूचुअल फंड एक ऐसा रास्ता है जिसमें भविष्य के लिए आप उपयुक्त और सुरक्षित ब्याज अर्जित करने के लिए हर महीने एक निश्चित राशि का निवेश करते हैं। तो चलिए अब संक्षेप्तरूप में म्यूचुअल फंड के बारे में जानते हैं। म्यूचुअल फंड ये शेयर बाजार का एक हिस्सा है। फर्क सिर्फ इतना है कि शेयर बाजार में आपको अपना समय निवेश करना होता है और खुद सीखना होता है, और म्यूचुअल फंड में हम किसी प्रमाणित व्यक्ति या प्रमाणित कंपनी के माध्यम से अपना पैसा घुम फिरकर शेयर बाजार में लगा सकते हैं। म्यूचुअल फंड में आम तौर पर हम दो तरह से निवेश कर सकते हैं, Lumpsum और SIP (Systematic Investment Plan )।




म्यूचुअल फंड में पैसा कैसे बढ़ता है?


 शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड, सभी की प्रगति पंजीकृत कंपनी पर निर्भर करती है। जैसे-जैसे कंपनी बढ़ेगी, वैसे-वैसे उनकी बिक्री भी होगी। और अगर बिक्री बढ़ती है तो निश्चित रूप से कंपनी अच्छा लाभ कमा सकती है, और अगर कंपनी लाभ कमाती है, तो उस लाभ का एक छोटा सा हिस्सा उस कंपनी के निवेशकों को ब्याज के रूप में म्यूचुअल फंड के माध्यम से दिया जाता है।


निवेश करना चाहते हैं ! लेकिन सही कंपनी की पहचान कैसे करें?


शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड एन दोनो में निवेश करते वक्त सबसे पहला सवाल यही उठता है कि किस कंपनी के म्यूचुअल फंड में निवेश किया जाए। क्‍योंकि म्यूचुअल फंड में कई कंपनियां रजिस्‍टर्ड भी होती हैं। तो इन सभी कंपनियों में से सही कंपनी की पहचान कैसे करें इसका जवाब आपको कोई नहीं बताएगा। इसकी वजह है आ


ज के दौर का कॉम्पिटिशन। अगर वह आपको अपना सक्सेस मंत्र बता दे तो आप उससे भी ज्यादा ताकतवर हो जाओगे ऐसा उसे लगता है। इसी कारण से अपने अंदर के गुण कोई किसी को नहीं सिखाता। हाँ ! ऐसी ही है आज के बदलते दौर का नजरिया। तो ये सवाल है ! तो जवाब भी होगा। इसका उत्तर यह है कि हमें इसके बारे में भी पता लगाना होगा। इसे हम कई किताबों से और साथ ही Google देवता के माध्यम से महत्वपूर्ण जानकारी निकाल सकते हैं। इसका सीधा सा जवाब है कि आपको उन कंपनियों में निवेश करना चाहिए जिनके उत्पादों या सेवा का आपने अनुभव लिया हो।


शेयर बाजार या म्यूचुअल फंड के मध्यम से भारत देश को कैसे फायदा हो सकता है ?


 अब जाहिर सी बात है कि, जैसे-जैसे भारतीय कंपनियां बढ़ेंगी, उस दौरान भारत का आर्थिक विकास भी होगा। यदि हमारा देश आर्थिक रूप से विकसित करना चाहते हो, तो बड़ी कंपनियों के साथ-साथ छोटे-छोटे उद्यमियों को अधिक मेहनत देकर अपने शहर का विकास करना होगा। शहर के विकास से राज्य का विकास होगा, और जब राज्य का विकास होगा तो भारत देश का भी विकास होणा निच्चीत है | इसे भारत की वास्तविक प्रगति के रूप में जाना जाएगा |      


 


शेयर बाजार और म्यूचुअल फंड को लेकर लोगों की राय ?


अब आम तौर पर लोग निवेश के बारे में नकारात्मक राय रखते हैं चाहे वह शेयर बाजार हो या म्यूचुअल फंड| उनको अगर पुछो निवेश क्या हैं ? तो उनसे केवल एक ही उत्तर की अपेक्षा की जाती है, शेयर बाजार लोगों को धोखा देता है, इसलिए हम इसमें निवेश नहीं करते हैं। अब हमें उनसे बहस करने की बजाय इस बारे में कुछ जानकारी समझकर बतानी चाहिए। इस दुनिया में हर कोई कुछ नया सीखना चाहता है ! लेकिन यहां सवाल उठता है कि उन्हें सही मार्गदर्शन नहीं मिल रहा है। अगर हम उनके मन से शेयर बाजार के बारे में संदेह को दूर कर दें, तो निश्चित रूप से हम कुछ नया सीखेंगे और अपने देश के निर्माण में एक छोटा सा योगदान करेंगे।



निवेश कैसे शुरू करें?


सब कुछ पढ़ने के बाद आप सोच रहे होंगे कि अब हम कहां से शुरू करें। अगर आप सच में इसके बारे में कुछ सीखना चाहते हैं और पैसा लगाना चाहते हैं तो सबसे पहले उस कंपनी के बारे में कुछ जानकारी जुटा लें। आपको वास्तव में किस कंपनी में निवेश करना चाहिए ? सही कंपनी की नेट वर्थ के बाद हमें यह सोचना चाहिए | इसका भी विचार करे कि हम हर महीने कितना पैसा जमा कर सकते हैं और उसी राशि को म्यूचुअल फंड में निवेश कर सकते हैं। यदि हम कुछ वर्षों तक औसतन ऐसा करते हैं, तो निश्चित रूप से हम 40 वर्ष की आयु तक आर्थिक रूप से स्वतंत्र हो सकते हैं।


तो सोच क्या रहे हो, आज ही शुरू करें ! और अनुभव ले नये दौर का |


                                                                                          लेखक

प्रथमेश राजू गणेशकर

(बी.कॉम, डी.टैक्स, जी.डी.सी.अँड ए )

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

"म्युच्युअल फंड" हा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये आपण दर महिन्याला निश्चित पैशांची गुंतवणूक करून भविष्यासाठी योग्य आणि सुरक्षित असे व्याज मिळण्यासाठी तयार केलेला मार्ग. तर आता आपण म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर म्युच्युअल फंड हे शेअर बाजार मधील फक्त एक भाग आहे. त्यामध्ये फरक एवढाच असतो कि, शेयर बाजार मध्ये आपल्याला वेळ देऊन तसेच स्वतः शिकून पैशाची गुंतवणूक करावी लागते. आणि म्युच्युअल फंड मध्ये आपण एका प्रमाणित व्यक्तीला किंवा प्रमाणित कंपनीच्या माध्यमातून आपण आपले पैसे शेयर बाजार मध्ये गुंतवणूक करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये साधारणतः आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो. एक म्हणजे Lumpsum गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे SIP (Systematic Investment Plan).

गुंतवणूक तर करायची आहे पण योग्य कंपनी कशी ओळखावी ?

शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करत असतांना सर्वात पहिला प्रश्न असा पडतो ते म्हणजे कोणत्या कंपनी च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची. कारण असंख्य कंपन्या म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा नोंदण्या झालेल्या आहेत. तर मग या सर्व कंपन्यामधून योग्य कंपनी कशी ओळखावी, तर याचे उत्तर सुद्धा आपल्याला कोणीही सांगणार नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या युगाची स्पर्धा. तो जर त्याचे यशस्वी होण्याचे मंत्र तुम्हाला सांगेल तर मग तुम्ही त्याच्या पेक्षा अधिक शक्तिशाली व्हाल. त्याच कारणाने कोणीही आपल्या मधील गुण कोणालाही शिकवत नाही. होय ! अशीच मानसिकता आहे आजच्या बदलत्या युगाची. तर मग प्रश्न आहे तर याचे उत्तर सुद्धा असेलच. त्याचे उत्तर म्हणजेच अस कि, याची सुद्धा माहिती आपल्यालाच काढावे लागेल. ते आपण अनेक पुस्तकांपासून तसेच गुगल देवताच्या च्या माध्यमातून काढू शकतो. एक सोपी उत्तर आहे कि, आपण ज्या कंपनी च्या वस्तू किंवा अनुभव जाणवला आहे अशाच कंपनी मध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे.

म्युच्युअल फंड मध्ये पैश्यांची वाढ कशी होते ?

               शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड असो या सर्वांची प्रगती नोंदणी झालेल्या कंपनी वर अवलंबून असते. जशी जशी कंपनी वाढेल त्याच प्रमाणे त्यांची विक्री सुद्धा वाढेल. आणि विक्री वाढली तर नक्कीच कंपनी चांगल्या प्रकारचे नफा मिळवू शकते, आणि जर कंपनीला नफा झाला तर त्या नफा मधील एक छोटासा भाग हा त्या कंपनी मधील गुंतवणूकदारांना व्याजाच्या रुपात मिळत असते.

 

शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंडामुळे भारत देशाला फायदा कसा ?

                आता साहजिक आहे कि, जस जश्या भारताच्या कंपन्या वाढेल त्याच प्रमाणे भारत देश सुद्धा आर्थिकरित्या विकसित होणार. आपला भारत देश जर आर्थिकरित्या विकसित करायचा असेल तर मोठ्या कंपन्यांबरोबर छोट्या उद्योजकांना सुद्धा यावर अधिक भार देऊन आपल्या शहराला विकसित करावे लागेल. हीच खरी भारताची प्रगती म्हणून ओळखल्या जाईल.

लोकांचे शेयर बाजार, म्युच्युअल फंड बद्दल चे विचार ?

आता कस आहे, शेयर बाजार असो किंवा म्युच्युअल फंड या दोन्ही गुंतवणुकीबद्दल साधारणतः लोकांचे मत नकारात्मक असते ते म्हणजे गुंतवणूक म्हटलं म्हणजे त्यांच्या कढुन एकच उत्तर अपेक्षित असते ते म्हणजे शेयर बाजार मधून लोकांची फसवणूक होते, त्यामुळे आम्ही यात गुंतवणूक करत नाही. आता आपण त्यांच्याशी वाद केल्यापेक्षा त्यांनाच याबद्दल थोडी माहिती समजून सांगितली पाहिजे. या जगात प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकायचं असत फक्त प्रश्न इथेच निर्माण होतो कि त्यांना योग्य मार्गदर्शन नाही मिळत. त्यांच्या मनातील जर आपण शेयर बाजार बद्दल शंका काढल्या तर नक्कीच आपण काही तरी नवीन शिकू आणि आपला देश घडविण्यासाठी एक छोटा सहभाग करू.


गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी ?

सर्व तर वाचून झालं पण नक्की सुरुवात कुठुन करावी हाच प्रश्न आपल्याला पडला असेल. खरंच जर आपल्याला याबद्दल काही शिकून पैशाची गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिले त्या कंपनी बद्दल थोडी माहिती जमा करा. नेमक आपल्याला कोणत्या कंपनी मध्ये गुंतवणूक कराची आहे. योग्य कंपनीची जेव्हा निवळ झाली त्यानंतर आपण महिन्याला किती पैसा जमा करू शकतो याबद्दल विचार करून तीच रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. हेच जर आपण सरासरी काही वर्ष करत गेलो तर नक्कीच आपण वयाच्या ४० पर्येंत आर्थिकरित्या स्वतंत्र होऊ शकतो.

तर मग आजच सुरुवात करताय ना !

प्रथमेश राजु गणेशकर
( B.COM, D.TAX, GDC&A )

Friday, October 28, 2022

शिक्षणाचा प्रभाव | POWER OF EDUCATION | The effect of education | The power of education

असे म्हणतात की, शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता. हे नक्की बरोबर आहे का ? मग आज या विषयावर चर्चा करूया. 

           मूलं जन्माला आली की त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे टाकले जाते, की माझा मुलगा / मुलगी भरपूर अभ्यास करून आमचे नाव मोठ करणार . अभ्यासाचं ओझं एवढं वाढते की लहान मुलांना त्यांची शाळेची बॅग जड वाटायला लागते. पण काय करणार ? हा नवा भारत आहे, जो जास्त शिकलेला आहे त्यालाच समाजात उच्च दर्जा दिला जातो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असायला पाहिजे. मग तो अभ्यास असो, किंवा मोबाईल फोन !

          शिक्षणातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात ज्या आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. शिक्षण हे सर्व काही नाही, पण शिक्षणापेक्षा दुसरे कोणते मार्ग आहे. आजकाल शिक्षणाचे सुद्धा प्रकार तयार होत आहेत. कोणी जास्त पैसे देऊन खाजगी शाळेत शिक्षण घेत आहेत, तर कोणी कमी पैसे देऊन सरकारी शाळेत शिक्षण घेत आहेत. शेवटी, शिक्षण ते शिक्षण आहे, काय ती सरकारी शाळा अन काय ती खाजगी शाळा?
          
        
     शिक्षण हे काय आहे ? ज्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनीअर या पदवीसाठी कित्येक वर्षे शिक्षण घेतले आणि ही पदवी मिळवली. त्यांना विचारा आणि त्या अभ्यासातून ते कुठे पोहोचले ते पहा. आयुष्यात कधीतरी डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्याकडे तर आपल्याला जावं लागतं, तेव्हाच आपल्याला खऱ्या शिक्षणाचा प्रभाव माहिती पडते. 
 
उच्च शिक्षणाने पुढील आयुष्यासाठी खूप काही शिकायला मिळते आणि तसे शिक्षण कधीच पैशाने विकत घेता येत नाही. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर योग्य शिक्षण, अधिक पैसा आणि निरोगी शरीर या गोष्टींचा एकाग्रतेने विचार करून यावर अंमल बजावणी केली पाहिजे.

      केवळ पालकांच्या दबावाखाली येऊन शिक्षण नाही तर, तर आपल्या उज्वल भविष्यात या शिक्षणाचा काय फायदा होईल याकडे लक्ष द्या. या सर्व गोष्टी आपल्याला पुढे जाण्यास नक्कीच मदत करतील.
     
प्रथमेश राजू गणेशकर
 (बी. कॉम, डी टॅक्स ) 

गुंतवणूकीचे फायदे 2 | Benefits of Investment | POWER OF INVESTMENT


भारताच्या इतिहासात प्रगतीची सर्वात मोठी अशी लाट अवघ्या काही वर्षातच येणार आहे त्याचे कारण असे की, भारताच्या लोकसंख्येत 22 टक्के तरुण युवावर्ग ( वयोगट 18-29 वर्षे ) आहेत, यांना आपण भारताची खरी युवाशक्ती देखील म्हणता येईल. तरीही बहुतांश टक्के युवाशक्ती व्यसनांच्या आहारी गेले आहेत. कुठलेही व्यसन माणसाला पैशांनी तसेच शरीराने कमजोर करून टाकतो. तर आज आपण एका कथेच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणुन घेऊया ज्या आपल्याला आपल्या पुढील भवितव्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यांचा आपल्या भावी जीवनात एक मुख्य सहभाग राहणार आहे..

       एका गावात श्याम नावाचा मुलगा राहत होता. गावातला सर्वात श्रीमंत सरपंचाचा एकुलता एक मुलगा. आणि जसा श्याम तसेच त्याचे मित्रगण. ते म्हणतात ना की, वाईट सोबतीचा असर खूप वाईट असतो. वयाच्या अवघ्या काही वर्षात त्यानी व्यसनाला सुरूवात केली. दिवसातला बहुतांश वेळ तो व्यसन करायचा. त्याच्या शाळेतील शिक्षक त्याला नेहमी सांगायचे वयवर्ष 20 ते 30 हे जीवन घडविण्याचं राहत असे. हेच १० वर्ष आपले खरे आयुष्य घडवत असे. पण मात्र श्याम ने वयाच्या विसाव्या वर्षी पासुन आपल्या मित्रांना पाहून सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. सिगरेट च्या आहारी तो जास्त प्रमाणात गेला होता. दररोज 60 रुपये तो त्यात घालवायचा. महिन्याला 1800 रुपये तसेच वर्षाला त्याचे 21,600 रुपये धुव्याच्या रुपात उडून जायचे. आनंद हा मात्र काही वेळ असतो पण त्या व्यसनामध्ये लागलेला पैसा परत येत नाही. असेच करता करता काही वर्ष निघून गेले.

             ते म्हणतात ना 'देर आये पर दुरुस्त आये' हळू हळू जसे त्याचे पैसे संपायला लागले तसे तसे त्याचे व्यसनी मित्र त्याचा साथ सोडू लागले. एक दिवस आला तो एकटाच स्वतःचा विचार करू लागला की, आपले बाबा गावचे सरपंच आणि आपण त्यांनी आयुष्यात कमावलेली पूर्ण इज्जत आपण वाया घालवली. त्याला त्याची चूक वयाच्या 30 व्या वर्षी कळली. जेव्हा हातात एक रुपया सुद्धा थांबत नव्हता. घरच्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. जबाबदारी माणसाला सर्व काही शिकवते. 

       त्यानी ठरवले की, जे काही १० वर्षात झाले ते बरोबर नाही झाले व तसेच स्वःतावर नियंत्रण ठेवण्यास सुरू केले. विचार पक्का केला आणि 30 व्या वर्षीपासुन व्यसन करणे पूर्णपणे बंद केले. आणि तेच 1800 रुपये जे त्याचे महिन्याला व्यसनात जायचे त्या पैशाला योग्य मार्गी म्हणजे एका INDEX FUND / MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक सुरू केली. काही महिने त्याला त्रास झाला, भरपूर समस्या त्याच्या समोर आल्या पण जेवढ्या जिद्दीने तो व्यसन करायचा तेवढ्याच जिद्दीने तो दर महिन्याला आपल्या पैशाची गुंतवणूक करायचा. त्याला हळू हळू आपले जुने दिवस आठवायला लागले. ते आठवून तो खूप निराश व्हायचा. आणि म्हणायचा की मी तेव्हाच जर व्यसनांचा दूर राहून गुंतवणूक केली असती तर आता सुखी झालो असतो. पण उशिरा का असो ना त्यानी शेवटी चांगला निर्णय घेतला होता.

      पाहता पाहता वयवर्ष 60 पर्यंत त्यानी पगारातले पैसे शिल्लक काढून काही टक्क्याचा वार्षिक रिटर्न ने 14,25,600 रुपये पेक्षा अधिक रुपये शिल्लक केले. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की आपल्या जवळ म्हाताऱ्या वयात येवढी मोठी रक्कम आपण बचत केली. त्या मागची त्याची मेहनत आणि व्यसनावर नियंत्रण ठेवून त्याला हे सर्व शक्य झाले. 


    तसेच मित्रांनो सांगायचं झालं तर सिगारेट बनवणारी कंपनी ITC या कंपनीचा शेअर 2000 साली 18 रुपयाचा होता. पाहता पाहता 22 वर्ष निघून गेले आणि त्या शेअर ची किंमत 2022 व्या वर्षी ३३० रुपयाचा च्या जवळपास आहे. याला आपण उत्तम गुंतवणुकीची ताकद म्हणू शकतो. ( हा शेयर सल्ला म्हणून नाही तर फक्त एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडत आहे ) 

  व्यसन तुमचे आरोग्यचं नाही तर संपत्तीला सुद्धा नुकसान पोहोचवते. व्यसनाला तुमच्या जीवनावर हावी होऊ देण्यापेक्षा तुम्ही व्यसनाचा दूर राहा. आपल्या भविष्याचे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. आपले दिवस आपणच बदलू शकतो, निच्छय करा आणि आजपासूनच सुरूवात करा एका नवीन जीवनाची...

प्रथमेश राजु गणेशकर
( बीकॉम, डी.टॅक्स )

Friday, June 10, 2022

दहावी आणि बारवीचा रिझल्ट लागला ! सल्यांपासून सावधान | 10th and 12th results are out! Beware of advice...

    वर्षभर अभ्यास करून अवघ्या तीन तासाचे प्रयत्न नक्कीच आपल्याला भविष्यापर्यंत अतिवेगाने पोहोचवत असते. दहावी असो की बारावी रिझल्ट लागल्यावर आपली धावपळच सुटते की आता पुढे काय करायचं?
 रिझल्ट लागल्यावर आपल्याला सल्ला देणारे असंख्य लोक आपल्याला आढळते. काही म्हणतात डॉक्टर हो, इंजिनिअर हो तर काही म्हणतात वकील हो. असे अनेक सल्ले देणारे लोक आपल्याला आढळते. ज्यांना त्यातलं काहीच माहिती नाही असे लोक सुध्दा आपल्याला सल्ले देत असतात. आणि त्या सल्ल्यांमुळे आपले डोक गोंधळून जाते. समजत नाही काय करावं तर. 
       आता मला सांगा पेपरसाठी अभ्यास तर आपणच केला आहे तर मग काय खरं ! अन काय खोटं ! आहे हे तर आपल्याला समजायला पाहिजे. त्यांनी म्हटल की ह्या क्षेत्रात जा छान आहे थोड कठीण आहे पण हे छान आहे, तर आपण लगेच धावपळ करतो त्या मार्गी जायला. जर अभ्यास आपणच केला तर आपल्याला सुद्धा माहीत असायला पाहिजे की काय आपल्याला उत्तम रित्या झेपणार. कशात आपण आपले करिअर घडवू शकतो. 
  पुढे काय करावं यातच आपण गोंधळून जातो. आणि मग चुकीचा निर्णय घेतो. चर्चा करायचीच असेल तर क्लासेस मधील आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक किंवा शिक्षिका राहतातच त्यांच्याशी चर्चा करा, जे आपल्या कार्यात यशस्वी झाले त्यांच्याशी चर्चा करा. यशस्वी लोकांसोबत चर्चा करा. आपल्याला नक्कीच त्यात यश मिळू शकते. दहावी नंतर बरेचशे रस्ते आपल्यासाठी मोकळे असतात. कला, वाणिज्य, विज्ञान, आय टी आय तसेच इंजिनियरिंग अशा अनेक क्षेत्रात आपण आपले भविष्य घडवू शकतो. या व्यतिरिक्त अजूनही अनेक क्षेत्र आहेत. आपल्याला पुढे अनेक संकटे आपल्या सोमोरे येऊ शकते तर आपण भान राहून आपले करिअर निवडले पाहिजे. 

  योग्य चर्चा कोणाबरोबर करावी ? 
 
            क्लासेस मधील आपले शिक्षक किंवा शिक्षिका राहतात त्याच्याबरोबर चर्चा करायची त्यांना नक्कीच इतरांपेक्षा जास्त माहिती असते. कला वाणिज्य विज्ञान तसेच इंजिनियरिंग अशा क्षेत्रात जे यशवी झाले आहे त्यांच्यासोबत चर्चा करा. अनेक करिअर मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून थोडी माहिती घ्यायची. नक्कीच अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या कमी पडू शकते. शेवटी अभ्यास तर आपणच केला आणि करिअर आपल्यालाच घडवांव करावं लागतं. सर्वांकडून माहिती गोळा करून आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडावे. 

 तसेच बारावी उत्तीर्ण झालेल्यांना जवळपास माहितीच असते की आपण काय करू शकतो. आणि बारावी पासुन चे शिक्षण हे कदाचित दहावी च्या निर्णयावर अवलंबून असते. बारावी नंतर अनेक जबाबदारी आपल्या पुढे येतात. तसेच उच्च शिक्षणाला असंख्य असा पैसा सुध्दा लागतो. म्हणून जे आपल्याला झेपत असेल असेच क्षेत्र निवडावे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट असे जे सर्विस इंडस्ट्रीज आणि सरकारी नोकरीची तयारी आपण दहावी पासूनच केली तर नक्कीच आपल्याला पुढे याचा फायदा होऊ शकतो. 

आणि जे विद्यार्थी व विद्यार्थीनी यात नापास सुद्धा झालेले आहेत त्यांनी निराश न होता अधिक मेहनतीने पुढील पेपरसाठी तयारी करायला आत्तापासूनच सुरूवात करायला हवी. आणि आपण कुठे कमी पडलो याचे नक्की भान असूनच आपण अभ्यास केला पाहिजे. जसे वाघ शिकार करण्यासाठी दोन पाऊले मागे घेऊन शिकार करतो असेच आपण नापास झालो की पुन्हा तयारी करायला हवी. पुन्हा एक नविन धेय ठेवायला हवे.

सर्व दहावी व बारावी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीचे मनपूर्वक अभिनंदन. 


     प्रथमेश राजु गणेशकर

Monday, April 4, 2022

नोकरी च्या पलीकडे | Beyond the job | JOB SECTOR

भारतात लेबर किसान पार्टीने १ मे १९२३ साली पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. त्यावेळी भारतात कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाचा झेंडा वापरण्यात आला होता. भारतात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. पण मात्र नोकरी म्हणजे गुलामगिरीच होय. सामान्यतः दहावी चे शिक्षण पूर्ण करुण ९९ टक्के मुले मूली नोकरी करण्याचा दिशेने वळतात. नोकरी करण्याचे कारण म्हणजेच घरची परिस्थिती बरोबर राहत नाही तसेच बाबांचा पगार घरच्या खरचांपेक्षा कमीच असतो आणि पुढील भवितव्यासाठी उच्च शिक्षणाला पैसा तर लागणारच ना. जसं जसं वय १८ च्या वर जाते तस-तसे घरच्यांची ईच्छा असते की मुलगा डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावा. आपल्याला या गरिबीतून दूर घेऊन जावा. त्यांच काय चुकलं हो ! सामान्य माणसाच्या जीवनात हेच मोठे ध्येय असते. कधी सुख तर कधी दुखः असच राहते हो सामान्य माणसाचे जीवन. प्रत्येकाला आयुष्यात एक एक पायरी चढून यश मिळत असते, एकदम तर कोणिही एकदम रातोरात मुकेश अंबानी किंवा रतन टाटांसारखे यशस्वी तर नाही होणार...
वेळ लागणार, दिवस येणार...
सर्वकाही बरोबर होणार...
           
            बरोबर होणार म्हणजेच काय तर 'नोकरी'
                      
                                नोकरी करून कधीच कोणीही श्रीमंत होत नाही. नोकरी करने म्हणजे फक्त मालकाचा खिचा भरविण्यासाठी काम करीत असलेले मजूरच होय. दिवस रात्र राब राब राबतो, कष्ट करून तो मालकाचा खिचा भरवितो. या सर्व मेहनतीचे फळ त्याला काय मिळते तर चिमुटभर पगार. त्यातही जर एक दिवस सुट्टी घेतली की पगारात कपात. कधी दहा मिनिट उशिरा कामावर पोहोचला की ना-ना प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. बोटावर मोजण्याइतके मालक या देशात राहतात की, जे आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा एक भाग समजतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. सुख असो की दुःख ते नेहमी त्यांच्याबरोबर राहतात. 
                        तर अशी दुर्दशा होते नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची. नोकरी करण्यापेक्षा छोटे असो किंवा मोठे पण आपले साम्राज्य तयार करा. व्यवसाय छोटा असो का मोठा शेवटी व्यवसाय तो व्यवसायच असतो. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा MAKE IN INDIA व 'आत्मनिर्भर भारत' या सारखे अनेक सुविधा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी निर्माण केल्या आहे. 
              भारताचे नामंकित उद्योजक अमन गुप्ता, अश्र्निर ग्रोव्हर, अनुपम मित्तल, पियूष बंसल, नमिता थापर, विनिता सिंग व गजल अलघ यांच्या मार्गर्शनाखाली SHARK TANK INDIA सारख्या मालिकेमुळे अनेक छोट्या मोठ्या संकल्पना आपल्याला दिसायला येतात. या मालिकेतून घराघरात एक उद्योजक निर्माण होऊ लागले आहे. छोट्या व्यवसावरच मोठ्या व्यवसायाची सुरुवात होते. आपल्या भारत देशातील तरुण पिढी विदेशात जाऊन नोकरी करतात आणि विदेशाला पैसा तसेच त्यांना यश मिळवून देतात. व्यवसाय करण्याचे योग्य वय हे २० ते ३० वर्ष्यापर्यंत आहे. तरुण असल्याचा फायदा घ्या. जर ३० वर्षानंतर व्यवसाय सुरू केला तर अनेक अडचणी समोर येतात. लग्न असो, किंवा संसार त्यात माणूस बांधून राहतो त्यावतिरिक्त तरुण वयात व्यवसाय सुरू करावा. कारण २० ते ३० वर्ष हे धडपडीच असते जर कदाचित अपयश जरी आले तरी प्रयत्न करता येते. 
पण जर प्रयत्नच नाही केले तर यश काय ? अन अपयश काय?               
                                        साधाणपणे पाहण्यास झाले की ३० वर्षापर्यंत युवावर्ग सरकारी नोकरीच्या शोधात राहतात आणि आपले अर्ध तरुणपण त्यातच घालवतात. तेच जर विसाव्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि ५ वर्ष त्यासाठी जीवतोड मेहनत केली तर कदाचित तोच व्यवसाय तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकतो. प्रयत्न करणे सोडू नका दहा अपयशानंतर ११ वेळा यश येऊ शकते. तरी प्रयत्न करत रहा. व्यवसायात अनेक संकटे येऊ शकते त्याला मात द्यायची ताकद असू द्या. नोकरी करणे म्हणजे 'गुलामगिरी' करणेच होय. आणि भारताची ओळख गुलामगिरी करणारा देश म्हणून झाली आहे. ते मग इंग्रांपासून असो की नोकरीपर्यंत. स्वतःच्या भविष्याचा पाया मजबूत करायचा असेल तर नोकरी शिवाय पर्याय नाही पण आयुष्यभर नोकरी करणे म्हणजे १९४७ शतकातला काळ निर्माण करणे होय. 
“तर उठा, जागे व्हा आणि पहा की नोकरीच्या पलीकडे किती मोठे जग आहे आणि सुरूवात करा एका नवीन जीवनाची......”

"Wake up and see how big the world is beyond the job"


                                                        - प्रथमेश राजु गणेशकर 

Friday, February 25, 2022

गुंतवणूकीचे फायदे | Benefits of Investment | POWER OF INVESTMENT

                भारताच्या लोकसंख्येत 22 टक्के तरुण (18-29 वर्षे) आहेत, यांना युवाशक्ती देखील म्हणता येईल. तरीही बहुतांश टक्के युवाशक्ती व्यसनांच्या आहारी गेले आहेत. व्यसन मनुष्याला पैशांनी आणि शरीराने सुध्दा कमजोर करून टाकतो. तर आज आपण एका गोष्टीच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणुन घेऊया ज्या आपल्याला आपल्या पुढील भवितव्यासाठी साठी अत्यंत गरजेचे आहे.
                   एका गावात राम नावाचा मुलगा राहत होता. वयाच्या अवघ्या काही वर्षात त्यानी व्यसनाला सुरूवात केली. दिवसातला बहुतांश वेळ त्याचा व्यसन करण्यात जायचा. थोरपुरूष सांगायचे वयवर्ष 20 ते 30 हे जीवन घडविण्याचं राहत असे. पण मात्र राम ने वयाच्या विसाव्या वर्षी पासुन सिगारेट ओढण्यास सुरूवात केली. सिगरेट च्या आहारी तो अती जास्त प्रमाणात गेला होता. दररोज 60 रुपये तो त्यात घालवायचा. महिन्याला 1800 रुपये तसेच वर्षाला 21,600 रुपये धुव्याच्या रुपात उडून जायचे. आनंद हा मात्र काही वेळ असतो पण त्या व्यसनामध्ये लागलेला पैसा परत येत नाही. असेच काही वर्ष निघून गेले.
             ते म्हणते ना 'देर आये पर दुरुस्त आये' त्याला त्याची चूक वयाच्या 30 व्या वर्षी कळली. जेव्हा हातात एक रुपया सुद्धा थांबत नव्हता. घरच्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. जबाबदारी माणसाला सर्व काही शिकवते. त्यानी ठरवले की हे योग्य नाही व तसेच स्वःतावर नियंत्रण ठेवले. विचार पक्का केला आणि 30 व्या वर्षीपासुन व्यसन करणे पूर्णपणे बंद केले. आणि तेच 1800 रुपये जे त्याचे महिन्याला व्यसनात जायचे त्या पैशाला चांगल्या मार्गी म्हणजे एका INDEX FUND / MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक केली. काही महिने त्याला खूप त्रास झाला, भरपूर समस्या त्याच्या समोर आल्या पण जेवढ्या जिद्दीने तो व्यसन करायचा तेवढ्याच जिद्दीने तो दर महिन्याला आपल्या पैशाची गुंतवणूक करायचा. त्याला हळू हळू आपले जुने दिवस आठवायला लागले. ते आठवून तो खूप निराश व्हायचा. आणि म्हणायचा की मी तेव्हाच गुंतवणूक केली असती तर आता सुखी झालो असतो. पण उशिरा का असो ना त्यानी शेवटी चांगला निर्णय घेतला.

           पाहता पाहता वयवर्ष 60 पर्यंत त्यानी पगारातले पैसे शिल्लक काढून काही टक्क्याचा वार्षिक रिटर्न ने 14,25,600 रुपये पेक्षा अधिक रुपये शिल्लक केले. त्याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की आपल्या जवळ म्हाताऱ्या वयात येवढी मोठी रक्कम आपण बचत केली. त्या मागची त्याची मेहनत आणि व्यसनावर नियंत्रण ठेवून त्याला हे सर्व शक्य झाले. 

              तसेच मित्रांनो सांगायचं झालं तर सिगारेट बनवणारी कंपनी ITC या कंपनीचा शेअर 2000 साली 18 रुपयाचा होता. पाहता पाहता 22 वर्ष निघून गेले आणि त्या शेअर ची किंमत 2022 व्या वर्षी 220 च्या जवळपास आहे. याला आपण उत्तम गुंतवणुकीची ताकद म्हणू शकतो. ( हा शेयर सल्ला म्हणून नाही तर फक्त एक उदाहरण म्हणून आपल्या समोर मांडत आहे ) 
        व्यसन तुमचे आरोग्यचं नाही तर संपत्तीला सुद्धा नुकसान पोहोचवते. आपल्या भविष्याचे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या. आणि सुरुवात करा एका नवीन जीवनाची...

सुरक्षित राहा, निरोगी राहा....

प्रथमेश राजु गणेशकर

Friday, February 18, 2022

शिवाजी महाराज - युवकांचे प्रेरणास्थान | Chhatrapati Shivaji Maharaj | Chhatrapati Shivaji Maharaj Biography


                        'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असे नारे आपल्याला दोन च दिवस ऐकायला मिळतात ते म्हणजे शिवजयंती तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे. ३६५ दिवसातून दोन दिवस जर सोडले तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव म्हणून राहते. शिवजयंती उत्सव आला की तेव्हाच आपल्यातला शिवप्रेमी जागा होतो. डिजे लावणार, बाईक रॅली काढणार, कल्ला-हल्ला करणार तो फक्त दोन दिवस. का बरं नाही करणार आमच्या राज्याची जयंती दोन वेळेस तर येते तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे. हा ते बर की आम्ही दोन दिवसचं महाराजांना पुजतो.  

                काही वर्ष झाले एक नविनच ट्रेण्ड युवापिढी मध्ये दिसत आहे. आपल्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काय, त्यांचे चित्र काय, भगवा ध्वज काय असे अनेक गोष्टींचा प्रभाव जरा जास्तच वाढला आहे. अहो, मला सांगा आता गाडीवर ध्वज, चित्र, नाव काढल्यानी कुठला शिवप्रेम जागा होतो. गाडीवर ना ना प्रकारचा धूळ बसतो, कुत्री घाण करतात अशा कित्येकदा अपमान होतो हो महाराजांचा. अशा नी नाही होत हो शिवभक्ती. आणि खरचं महाराजांना खुश करायचे असेल तर त्यांचा विचारांचा आदर आणि आचार विचारांवर अंमलबजावनी करा.
                    शिवछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक मनोरंजनाचे साधन तसेच वादविवाद निर्माण करण्याचे एक साधन झाले आहे. ज्या रस्त्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे त्याच रस्त्यावर आपले मायलेक सुरक्षित राहू शकत नाहीत. कस होणार या देशाचं. तुम्हाला नाही वाटत का ? काही बदल व्हायला हवा. शिवसाम्राज्य पुन्हा व्हायला हवे. 



                    आपल्या युवापिढीलाच त्याचा पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते. आपली शिवभक्ती फक्त शिवजयंती पर्यंत मर्यादित नसून ३६५ दिवस महाराजांच्या विचारांवर अंमलबजावणी केली पाहिजे. महाराजांच्या जन्मापासून अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनशैलीत त्यांचा वापर केला पाहिजे. महाराज्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. महाराजांच्या काही गोष्टी युवकांनी नक्की आपल्या विचारात आणायला पाहिजे आणि त्यावर ठाम राहायला पाहिजे.
                    
  तर आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया...
                      
प्रथम :- स्त्रियांबद्दलचा आदर 

             शिवछत्रपतींच्या राज्यात सर्व स्त्रियांना एकच मानसन्मान मिळायचा. ना कुणाबरोबर अन्याय व्हायचा, ना कुठल्याही महिलेची चेष्टा व्हायची. अहो स्वताच्या राज्यातील महिला तर महिला इतर राज्यातील महिलांना सुद्धा तोच मानसन्मान मिळायचा. महाराजांच्या काळात कुठल्याही स्त्री बरोबर अत्याचार झाले नाही. जर कुणी स्त्रियांचा हात देखील जबरदस्तीने धरला तर त्याचे हात कापून ठेवायचे येवढे महाराज कर्तव्यनिष्ट होते. 
  
      हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.
      

दुसरा :- वेळेचा पुरेपूर वापर

                       शिवबा हे वेळेचे एकदम पक्के होते. महाराजांना 'The Management Guru' असे देखील म्हणतात. महाराजांनी फक्त मूठभर मावळे हाती घेऊन मुघलांच्या विरोधात जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे अनेक कार्य वयाच्या ५० वर्षात महाराजांनी पूर्ण केले. आपण आपली कामे वेळेच्या आत पूर्ण केलीत तर आपले मावळे देखील आपली कामे वेळेच्या आत करण्यासाठी झटतात. हे तत्त्व महाराजांना चांगलेच माहिती होते. म्हणून कामे वेळेवर करणे, आजचे उद्यावर न टाळता ते आजच पूर्ण करायचे हे महाराज आपल्या वर्तवणुकितून मावळ्यांना दाखायचे. महाराजांनी कधीच कुठलेही कारण दिले नाही कारण त्यांच्या पाठीवर हिंदवी स्वराज्याची जबाबदारी होती. 
                       हे आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.


तिसरे :- कमी वयात नवनविन गोष्टी शिकल्या

              महाराजांनी आपले बालपण अनेक गोष्टी शिकण्यात वेळ दिला. तलवारबाजी असो वा घोडेस्वारी या बाबतीतही शिवबा पारंगत होते. महाराज एकही दिवस न चुकता दररोज तलवारबाजी चा सराव करायचे. रोज आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करायचे. महाराजांचे अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी आपल्या बाल वयात केल्या. त्या आपल्याला अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. जसे महाराजांनी आपले बालपण अनेक गोष्टी शिकण्यात वेळ दिला तसे आपण सुद्धा आपल्या बालपणात अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे. एकदा बालपणात मुलाला जी शिकवण लागली तीच त्याला पुढे घडवते. 

       हे आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे.


             शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितके सांगाल तितके कमीच आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना पासुन ते गडकिल्ले जिंकण्यापर्यंतचा अतिशय मोठा असा इतिहास आपल्याला अनेक पुस्तकात वाचायला मिळेल. पण आपण जर महाराजांच्या या तीन गोष्टींचे पालन जर केले तर नक्कीच आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होईल. शिवछत्रपती नुसतेच शिवजयंती पर्यंत मर्यादित नसून एकूण एक दिवस व त्यांच्या विचारांचा आदर आपण केला पाहिजे. हीच खरी महाराजांची शिवजयंती म्हणून ओळखली जाईल. 

३३ कोटी देवानंतर एक देव असा होऊन गेला ज्याच्यामुळे आमच्या घरातील माय आणि गोठ्यातील गाय ही सुरक्षित आहे. 

बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की......
              

Sunday, January 30, 2022

व्यसन करा | CARRIER | Health Effects of Cigarette Smoking | Smoking: Effects, Risks, Addiction, Quitting, Treatment

'व्य स न' या तीन शब्दामागे बरेचशे आयुष्य आधारित आहे. 

           ड्रग्स,गांजा, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा व इतर सर्व जिवघातक व्यसनांच्या आधिन आजची युवा पिढी जाते. आणि आयुष्याचं वाटोळं करुन येते. मग पुरुष असो स्त्रिया असो की युवावर्ग असो अशा सर्व पिढी या व्यसनाकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे. 

       काही काळ का असो ना पण त्यांना त्यामधून आनंद होत असतो. म्हणून सर्वजन व्यसन करतात.

          पण तोच काळ त्यांचा वाईट काळ म्हणून निर्माण होतो. व्यसनांची सुरुवात करायला काही वेळ लागत नाही पण त्यापासुन दूर राहायला किंवा त्याला दूर करायला संपूर्ण आयुष्य निघुन जाते. तर आज अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या गोष्टींचे व्यसन आपण नक्की केले पाहिजे.

    व्यसन करा हो पण या तीन गोष्टीचं...

  पहिले व्यसन म्हणजेच 'पैसा
                                        पैसा जेवढा कमवा तेवढा कमीच असतो. पण जेव्हा पैशाची अडचण येतेे तेव्हा ते सोडविण्यासाठी शेवटी पैसाच कामात पडतो. पैशाचे काम शेवटी पैसाच करतो. म्हणून वयवर्ष १८ ते ४० वर्ष होयपर्येंत माणसाने पैशाच्या मागे राहले पाहिजे. आश्चर्यचकित होण्यासारखे म्हणजे कोरोना काळात ज्यांनी शिक्षण घेतले होते त्यांच्या पेक्षा जे अशिक्षित होते त्यांनी या काळात अधिक जास्त प्रमाणात पैसा कमावला. मग तो भाजीवाला असो की दुधवाला अशा अनेक उद्योजकांनी पैसा कमावला. म्हणून पैसा कमाविण्यासाठी शिक्षणच घेणे आवश्यक नाही तर स्वबळ आवश्यक आहे.
                                        

दूसरे व्यसन म्हणजेच 'शिक्षण
                                      योग्य शिक्षण कधीच वाया जात नाही. मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ.स. १८४८ मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. शिक्षणामुळे मानवी जीवनातील एक शैक्षणिक गुण जागरूक होतो. योग्य शिक्षण हे आपल्या जीवनामध्ये खुप प्रभावशाली असते. नौकरीसाठी प्रथम प्राथमिकता शिक्षणालाच देतात.


तिसरे आणि शेवटचे म्हणजेच 'सुदृढ आरोग्य

                                                   शरीर सुदृढ तसेच आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करने आवश्यक असते. कारण पैसा कधिच आयुष्य विकत घेऊ शकत नाही. एकदा जीव गेले की गेलेच. दिवसातुन ४ पैकी १ जनांचा मृत्यु ह्रुदयविकारामुळेच होतो. तसेच ३० प्रमाणात लोकसंख्या हृदयवीकारामुळे आपले आयुष्य गमावतात. आता तर याचे प्रमाण युवा पिढींमध्ये सुद्धा अधिक जास्त प्रमाणात वाढले आहे. दररोज नियमित व्यायाम केला की मानवी शरीरात सकारात्मक विचार जागरूक होतात. त्यामुळे मन प्रफुल्लित होते व आयुष्यामध्ये सकारात्मक विचार व ऊर्जा निर्माण होते. म्हणून किमान दिवसातून १५ मिनिटे तरी नियमित व्यायाम केला पाहिजे. 

                                                  
      तर मित्रांनो ड्रग्स, गांजा, दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा व इतर जिवघातक व्यसनांच्या आहारी गेल्या पेक्षा शिक्षण, पैसा, सुदृढ आरोग्याचे व्यसन पाळा. नवनविन गोष्टी शिका आणि पैसा कमाविण्याचे अधिक मार्ग शोधून काढा. एका मार्गावर कधिच अवलंबून राहू नका. नव्या गोष्टी मानवाला नवीन ऊर्जा निर्माण करते.

               दहा मिनिटाच्या आनंदासाठी संपूर्ण आयुष्य धोक्यात टाकू नका. 
तेच दहा मिनिट नवनविन गोष्टी शिकण्यात दया. एक छोटा बदल एक नवीन ऊर्जा निर्माण करते.

                                            

                 "A Small Step Towards Success" 

                                                  प्रथमेश राजु गणेशकर

Saturday, January 15, 2022

सोपी नसते हो सैनिकांचे जीवन | Indian Armed Forces | Indian Armed Forces

भारतीय लष्कर दिन दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.                                             
यावर्षी भारत ७४ वा लष्कर दिन साजरा करत आहे.

हा प्रवास आहे भारतीय सैनिकांचा...
ही गोष्ठ आहे एका ग्रामीण गावातील..
त्या गावातील मुले नेहमी स्वप्न पाहत असे की त्यांना कधी भारताची सेवा करायची संधी मिळेल.. 

पण

संघर्ष प्रत्येक तर पायरीवर असतोच...

भारतीय सैन्याचा पेपर पासून त्यांची सुरुवात होते..
पेपर ला खुप अभ्यास केला असतो पण भिति राहते पेपर फुटण्याची..
कारण पेपर फुटला की तो अभ्यास व तो अमूल्य वेळ वाया जातो...
पेपर नंतर ट्रेनिंग व फिजिकल फिटनेस वगैरे वगैरे...
येवढ़ सगळ करून मग चिमुटभर मुलांची निवड होते...

आणि मग मुल लागतात देशाची सेवा करायला.

संपूर्ण आयुष्य आपल्या धरती मातेला अर्पण करुन देतात.

पण मात्र संघर्ष इथेच संपत नाही,

कारण सिमेवर प्रत्येक मिनिट डोळ्यात तेल घालून ऊभ राहव लागतं.

कारण कुठल्या दिशेने एक गोळी येणार आणि ऊंच आकाशात घेऊन जाणार. 
आई, बहिन, दादा अन बाबा यांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा देऊन जाणार.

भारतीय सैनिकांचे जीवन सोपी नसते हो. 

"उष्ण ऊन असो की असो गार वारा, उष्ण ऊन असो की असो गार वारा...
की असो थंड्या पाण्याच्या धारा, नेहमी सिमेवर उभा राहत असतो सैनिकांचा पाहरा.."

सोपी नसते हो भारतीय सैनिकांचे जीवन...

आपण आपली सर्व कामें करुन घेऊ शकतो गार झोप,
त्यांना काम केल्यावर पण नशीबी नसते थोड़ी तरी झोप...

सोपी नसते हो भारतीय सैनिकांचे जीवन...

रक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या कर्तृत्वास सलाम!

                                                                                                      - प्रथमेश राजु गणेशकर



Thursday, January 13, 2022

मकर संक्रांति का साजरी करतात ? Makar Sankranti 2022: Date, Puja Time, History, Significance | Makar Sankranti: Reaping the Benefits of the Season

(दिवस १४ जानेवारी २०२२)

भारतीय सांस्कृतीत सणांची मानवी जीवनात अधिक जास्त महत्व मानले जाते. कारण प्रत्येक सणांमागे काही ना काही उद्देश असतो.
मग दिवाळी असो की गुढीपाडवा हिंदू धर्माची एक वेगळीच शान आहे. इंग्रची वार्षिक कैलेंडर तसेच जानेवारी महिण्यातला पहिला हिंदू धार्मिक सण म्हणजेच 'मकर संक्रांति'.

या दिवशी तिळगुळ देऊन 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. मानवी जीवनातील कडवटपणा नष्ट होवो उद्देशाने एकमेंकांना तिळगुळ दिले जाते. 

मकर संक्रांति हा सण हिवाळ्यात  जानेवारी महिन्यात १० ते २० तारखेच्या जवळपास येत असतो. ठंडी मुळे त्वचा कोरडी होते आणि मानवी अंगातिल उष्णता कमी होते. तसेच तिळगुळ हे उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्‍याचे काम करत असते.


या दिवशी स्त्रिया दिवशी हळदी‍ कुंकू देण्या घेण्याच्या तसेच मतभेद दूर करण्याचा उद्देशाने गोळा होतात. आणि 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून दिवस साजरा करतात. तसेच पुरुष आणि तरुण मुल आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून तरी हा सण साजरा करण्याची प्रथा भारतात आहे. या दिवशी संपूर्ण आकाश रंगबेरंगी पतंगानी भरभरून जाते. आणि या दिवसाचा आनंदानी शेवट होतो.


अशा अनेक पद्धतिंनी भारतात मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

Tuesday, January 11, 2022

राष्ट्रीय युवा दिनविशेष

संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.

भारताचे भविष्य म्हणजे 'युवावर्ग'
नोकरी असो, व्यवसाय असो, राजकरण असो किंवा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला युवावर्गच पूढे दिसत असतो.

आपली मेहनत व कठोर परिश्रमांनी या देशाला नव्या मार्गावर युवावर्ग पोहोचवत असते.

पण

७० % युवावर्ग दारू, सिगरेट व इतर जीवघातक गोष्टींच्या आहारी गेलेले आहे. 

स्वताचे करियर घडविन्याच्या एवजी व्यसनाला प्रथम स्थान देत आहे.
व्यसन असले की पैसे पण कामी लागतातचं ३० रुपये असो की ५० रुपये रोज खर्च लागलाच असतो.

पैसे कमाविण्याएवजी त्याला गमाविण्याच्या मार्गी लावतात.


३० रूपये रोज ९०० रूपये महीना 

त्या व्यतिरक्त जर ५०० किंवा ६०० रूपयाची SIP ( SYSTEMIC INVESTMENT PLAN ) मध्ये जर गुंतवणुक केली आणि त्यात काही वर्ष्यात चांगले असे व्याज आपल्याला SIP च्या माध्यमातुन मिळत असते.

म्हणून पैसे गमाविण्यापेक्षा कमाविण्याच्या मार्गी लागा 
आणि भविष्य आरामदायी आणि सुरक्षित करा.
                           
"Find a way to make money rather than lose it."

                             -Prathamesh Raju Ganeshkar
                           



My Blog List